AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबांनींच्या घराजवळ पार्क केलेल्या ‘त्या’ गाडीत मिळाल्या नंबरप्लेटस; RTO च्या रेकॉर्डमध्ये चक्रावणारी माहिती

या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या गाडीत काही नंबरप्लेटसही मिळाल्या. या नंबरप्लेटस नक्की कशासाठी होता याचा उलगडा होऊ शकलेला नाही. | Mukesh Ambani residence

मुकेश अंबांनींच्या घराजवळ पार्क केलेल्या 'त्या' गाडीत मिळाल्या नंबरप्लेटस; RTO च्या रेकॉर्डमध्ये चक्रावणारी माहिती
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली इनोव्हा गाडी 'एनआयए'ने नुकतीच ताब्यात घेतली होती. मात्र, या गाडीविषयी NIAच्या अधिकाऱ्यांना अद्याप संभ्रम आहे.
| Updated on: Feb 26, 2021 | 10:32 AM
Share

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर गुरुवारी रात्री स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांच्या तपासात बुधवारी रात्री ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केल्याचे समोर आले होते. (A car full of explosives parked near Mukesh Ambani’s house at midnight)

एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून ही गोष्ट समोर आली होती. त्यामध्ये मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर बुधवारी मध्यरात्री एक वाजता स्कॉर्पिओ आणि इनोव्हा अशा दोन गाड्या आल्या होत्या. यापैकी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटके होती. ही गाडी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केल्यानंतर चालक गाडीतून उतरला आणि इनोव्हा गाडीत बसून निघून गेला.

या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला अंबानी यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या गाडीत काही नंबरप्लेटसही मिळाल्या. या नंबरप्लेटस नक्की कशासाठी होता याचा उलगडा होऊ शकलेला नाही. मात्र, या नंबरप्लेटसचे वाहतूक विभागाकडे (RTO) असलेले रेकॉर्ड तपासल्यावर चक्रावणारी माहिती समोर आली आहे.

1) MH 04 DN 9945

गाडीचा नंबर ठाणे आरटीओ रजिस्ट्रेशनचा आहे. पण या नंबरवरुन तपासणी केली असता गाडीचे पुर्व मुंबई आरटीओ मधून रजिस्ट्रेशन केले असून गाडी “कोलंबिया एम्बसी, परदेशी गाडी” असं रजिस्ट्रेशन मध्ये नमूद करण्यात आलय हा गाडी 12 वर्षे जुनी असून रजिस्ट्रेशन मध्ये गाडी पांढऱ्या रंगाची ह्युंदाई वेरना गाडी असल्याचे सांगण्यात आले आहे. गाडीचे रजिस्ट्रेशन लकी डी या मुलूंडमधील व्यक्तीच्या नावाने करण्यात आले आहे.

2) MH 01 BU 6510

गाडीचा नंबर मध्य मुंबई आरटीओमध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले असून गाडी मालक एक अति महत्वाच्या व्यक्तीच्या कंपनीच्या नावे असल्याचे नमूद असून गाडी सहा वर्षे जुनी आहे आणि हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ असल्याचे RTO रजिस्ट्रेशनमध्ये नमूद केले आहे.

3) MH 01 CZ 7239

गाडीचा नंबर मध्य मुंबई आरटीओ मध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले असून गाडी मालकाचे नाव रजिस्टर मध्ये निशांत सुर्वे असे नमूद करण्याच आले आहे आणि गाडी ही हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढ-या रंगाची जॅग्वार रेंज रोवर असल्याचे रजिस्टर मध्ये नमूद आहे

4) MH 01 DK 9945

या गाडीचा नंबरदेखील मध्य मुंबई आरटीओ मध्ये रजिस्टर असल्याचे नमूद करण्यात आले असून गाडी मालक एक अति महत्वाच्या व्यक्तीच्या कंपणीच्या नावे असल्याचे नमूद असून गाडी १ वर्षे जुनी आहे आणि हिरव्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी नसून पांढ-या रंगाची रेंज रोवर गाडी आहे असं RTO रजिस्ट्रेशन मध्ये नमूद आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ, घातपाताच्या उद्देशाचा संशय

डियर नीता भाभी और मुकेश भय्या, यह तो सिर्फ ट्रेलर है

(A car full of explosives parked near Mukesh Ambani’s house at midnight)

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.