डियर नीता भाभी और मुकेश भय्या, यह तो सिर्फ ट्रेलर है, अंबानींच्या घराबाहेरील कारमध्ये लेटर

स्फोटकांच्या बॅगमध्ये 25 एम एम सुपर पावररेझर एक्स्प्लोजिव्हची 125 ग्रॅम मात्रा होती | Mukesh Ambani Atilia Residence

  • कृष्णा सोनारवाडकर, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 9:35 AM, 26 Feb 2021
डियर नीता भाभी और मुकेश भय्या, यह तो सिर्फ ट्रेलर है, अंबानींच्या घराबाहेरील कारमध्ये लेटर
ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने....संभल जाना...', असा मजकूर या पत्रात असल्याचे समजते.

मुंबई: रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर गुरुवारी रात्री स्फोटकांनी भरलेली गाडी आढळून आली होती. गुन्हे शाखेकडून सध्या याप्रकरणाचा तपास सुरु असून आता क्षणाक्षणाला नवी माहिती समोर येत आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या स्फोटकांच्या बॅगमध्ये 25 एम एम सुपर पावररेझर एक्स्प्लोजिव्हची 125 ग्रॅम मात्रा होती. याशिवाय, सोलर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या डो बाजारगाव नागपूर असे लिहलेल्या 20 जिलेटीनच्या कांड्या बॅगमध्ये सापडल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सर्व साहित्य मुंबई इंडियन्स असे लिहलेल्या बॅगमध्ये ठेवले होते. (Letter to Mukesh Ambani with explosive bag outsie Atilia Residence)

गाडीत मिळालेल्या पत्रामध्ये काय लिहले होते?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर पार्क केलेल्या गाडीत स्फोटकांच्या बॅगसोबत एक पत्रही पोलिसांनी मिळाले. या पत्रातून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने….संभल जाना…’, असा मजकूर या पत्रात असल्याचे समजते.

अँटिलियाबाहेर QRT पथकाचे जवान तैनात

रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर मुंबईतील सुरक्षायंत्रणा हायअलर्टवर आहेत. या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेसाठी अँटिलिया निवासस्थानाबाहेर शीघ्र कृती दलाचे (QRT) जवान तैनात करण्यात आले आहेत. (Mumbai Police in action after explosives car found outside Mukesh Ambani Atilia Residence in Mumbai)

तर दुसरीकडे अंबांनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस कसून कामाला लागले आहेत. याप्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडे आहे. गुन्हे शाखेकडून या लोकांना शोधण्यासाठी 8 ते 10 पथके तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याची पाहणी सुरु आहे.

इस्टर्न एक्सप्रेस मार्गावर नाकाबंदी

मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईच्या इतर भागांमध्येही नाकांबदी करुन वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय, अनेक हॉटेल्स, ढाबा आणि लाँजमध्ये जाऊन पोलिसांची पथके चौकशी करत आहेत.

संबंधित बातम्या:

VIDEO : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ, घातपाताच्या उद्देशाचा संशय

जिथं स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते अंबानींचं अँटेलिया हाऊस कसं आहे?

मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी

(Letter to Mukesh Ambani with explosive bag outsie Atilia Residence)