अंबांनींसाठी सुरक्षायंत्रणा हायअलर्टवर; सीसीटीव्ही हार्डडिस्क ताब्यात, अँटिलियाबाहेर QRT पथकाचे जवान तैनात

अंबांनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस कसून कामाला लागले आहेत. | Mukesh Ambani Antilia reisidence

अंबांनींसाठी सुरक्षायंत्रणा हायअलर्टवर; सीसीटीव्ही हार्डडिस्क ताब्यात, अँटिलियाबाहेर QRT पथकाचे जवान तैनात
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 8:36 AM

मुंबई: रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर मुंबईतील सुरक्षायंत्रणा हायअलर्टवर आहेत. या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेसाठी अँटिलिया निवासस्थानाबाहेर शीघ्र कृती दलाचे (QRT) जवान तैनात करण्यात आले आहेत. (Mumbai Police in action after explosives car found outside Mukesh Ambani Atilia Residence in Mumbai)

तर दुसरीकडे अंबांनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस कसून कामाला लागले आहेत. याप्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडे आहे. गुन्हे शाखेकडून या लोकांना शोधण्यासाठी 8 ते 10 पथके तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याची पाहणी सुरु आहे.

इस्टर्न एक्सप्रेस मार्गावर नाकाबंदी

मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईच्या इतर भागांमध्येही नाकांबदी करुन वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय, अनेक हॉटेल्स, ढाबा आणि लाँजमध्ये जाऊन पोलिसांची पथके चौकशी करत आहेत.

स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा नंबर अंबानींच्या गाडीशी मिळताजुळता, नव्या खुलाशाने खळबळ

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा नंबर अंबानी यांच्या गाडीशी पूर्णपणे मिळताजुळता असल्याचे समोर आले आहे. ही माहिती मुंबई पोलिसांनी दिली असून पोलिसांनी ही गाडी जप्त करण्यात आली आहे. स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटकं ठेवणाऱ्यांनी मुकेश अंबानी यांच्या गाडीचा नंबर शोधून तशीच गाडी त्यांच्या बंगल्यासमोर पार्क केल्यामुळे हा पूर्णपणे नियोजित कट असल्याचे जवळजवळ स्पष्ट होत आहे

नेमका प्रकार काय?

मुकेश अंबनी यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर एक अनोळखी कार संशयास्पदरित्या पार्क करण्यात आली होती. ही बाब समोर आल्यानंतर यथे बॉम्ब स्कॉड पथक, एसएसजी कमांडो तसेच मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी दाखल झाले होते. बॉम्ब नाशक पथकाने या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये 20 जिलेटीनच्या कांड्या तसेच एक निनावी पत्रही आढळले होते. या पत्रामध्ये ‘ही फक्त झलक आहे’ अशा आशयाचा मजकूर लिहलेला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण मुंबई काही काळासाठी धास्तावली होती.

संबंधित बातम्या:

VIDEO : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ, घातपाताच्या उद्देशाचा संशय

जिथं स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते अंबानींचं अँटेलिया हाऊस कसं आहे?

मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी

(Mumbai Police in action after explosives car found outside Mukesh Ambani Atilia Residence in Mumbai)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.