अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर मुंबईत हायअलर्ट; पोलीस अ‍ॅक्शनमध्ये

अंबानींच्या घरबाहेर गाडी ठेवणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी ही कारवाई सुरु असल्याचे समजते. | Mukesh Ambani Antilia reisidence

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर मुंबईत हायअलर्ट; पोलीस अ‍ॅक्शनमध्ये
अंबानींच्या घरबाहेर गाडी ठेवणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी ही कारवाई सुरु असल्याचे समजते.
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 7:24 AM

मुंबई: रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर मुंबईत हायअलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलीस (Mumbai Police) अ‍ॅक्शनमध्ये आले असून नाकाबंदी आणि धाडसत्र सुरु झाले आहे. मुंबईच्या अनेक भागांमध्ये नाकांबदी करुन वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय, अनेक हॉटेल्स, ढाबा आणि लाँजमध्ये जाऊन पोलिसांची पथके चौकशी करत आहेत. अंबानींच्या घरबाहेर गाडी ठेवणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी ही कारवाई सुरु असल्याचे समजते. (Mumbai Police start checking vehicels after explosives car found outside Mukesh Ambani Antilia reisidence in Mumbai)

स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा नंबर अंबानींच्या गाडीशी मिळताजुळता, नव्या खुलाशाने खळबळ

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचा नंबर अंबानी यांच्या गाडीशी पूर्णपणे मिळताजुळता असल्याचे समोर आले आहे. ही माहिती मुंबई पोलिसांनी दिली असून पोलिसांनी ही गाडी जप्त करण्यात आली आहे. स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटकं ठेवणाऱ्यांनी मुकेश अंबानी यांच्या गाडीचा नंबर शोधून तशीच गाडी त्यांच्या बंगल्यासमोर पार्क केल्यामुळे हा पूर्णपणे नियोजित कट असल्याचे जवळजवळ स्पष्ट होत आहे

नेमका प्रकार काय?

मुकेश अंबनी यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर एक अनोळखी कार संशयास्पदरित्या पार्क करण्यात आली होती. ही बाब समोर आल्यानंतर यथे बॉम्ब स्कॉड पथक, एसएसजी कमांडो तसेच मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी दाखल झाले होते. बॉम्ब नाशक पथकाने या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये 20 जिलेटीनच्या कांड्या तसेच एक निनावी पत्रही आढळले होते. या पत्रामध्ये ‘ही फक्त झलक आहे’ अशा आशयाचा मजकूर लिहलेला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण मुंबई काही काळासाठी धास्तावली होती.

मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी मध्यरात्री 1 वाजता पार्क

अंबानी यांचं घर दक्षिण मुंबईतील पेडर रोडवर आहे. या परिसरात बुधवारी मध्यरात्री राखाडी रंगाची एक स्कॉर्पिओ दाखल झाली. नो पार्किंगचा बोर्ड लावलेल्या ठिकाणीच ही गाडी उभी होती. महत्वाची बाब म्हणजे या स्कॉर्पिओ गाडीसोबत त्या ठिकाणी अजून एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडीही होती. इनोव्हा गाडी ही बरोबर स्कॉर्पिओच्या मागेच होती. अंबानी यांच्या घराजवळ या दोन्ही गाड्या दाखल झाल्यानंतर स्कॉर्पिओ गाडीची लाईट बंद करण्यात आली. त्यानंतर मागे थांबलेली इनोव्हा गाडी स्कॉर्पिओ गाडीच्या काहीशी पुढे निघून गेली.

काही वेळ गाडीतून कुणीही उतरलं नाही!

काही वेळ गेला तरी स्कॉर्पिओ गाडीतून कुणीही खाली उतरलं नाही. 30 सेकंदाच्या फरकाने त्या ठिकाणावरुन एक टॅक्सीही पास झाल्याचं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे. त्यानंतर स्कॉर्पिओ गाडीतील व्यक्ती उतरते आणि पुढे उभी असलेल्या इनोव्हा गाडीत बसते आणि तिथून ती इनोव्हा गाडी निघून जाते, अशी प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे.

संबंधित बातम्या:

VIDEO : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं भरलेली स्कॉर्पिओ, घातपाताच्या उद्देशाचा संशय

जिथं स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते अंबानींचं अँटेलिया हाऊस कसं आहे?

मुकेश अंबानींच्या घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार; विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी

(Mumbai Police start checking vehicels after explosives car found outside Mukesh Ambani Antilia reisidence in Mumbai)

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.