Sunetra Pawar: विचार वेगळे असू शकतात पण…, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होताच कोणी केली लक्षवेधी पोस्ट?

Ajit Pawar wife Sunetra Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर अनेकांनी टीका देखील केली... आता सोशल मीडियावरील एक पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

Sunetra Pawar: विचार वेगळे असू शकतात पण...,  सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होताच कोणी केली लक्षवेधी पोस्ट?
Sunetra Pawar
| Updated on: Feb 01, 2026 | 10:22 AM

Ajit Pawar wife Sunetra Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांचं बुधवारी म्हणजे 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झालं. अजित पवार यांच्या अकस्मित मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणातील हलचालींनी वेग धरला. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची जागी कोणाची वर्णी लागणार अशा चर्चांनी जोर धरला. अशात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत होतं. अखेर गुरुवारी अजित पवार यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर शनिवारी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी हाती घेतली. शनिवार राज भवनातील लोक भवनात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

अजित पवार यांच्या निधनाच्या तीन दिवसांमध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांनी टीका देखील केली. यावर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर हिने सुद्धा स्वतःचं मत व्यक्त केलं आहे. विचार वेगळे असू शकतात, मतभेद असू शकतात पण माणूसपण टिकवणं हीच खरी गरज आहे… असं अंकिता म्हणाली आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट करत अंकिता म्हणाली, सुनेत्रा पवार यांनी शपथ घेणं म्हणजे दुःख नाकारणं नव्हे… कधी कधी जबाबदारी स्वीकारणं हेच दुःखावर उत्तर असतं. काहीजण अशा प्रसंगी कोसळतात तर काहीजण अधिक ठामपणे उभे राहतात. दोन्ही मार्ग मानवीच आहेत. सोशल मीडियावर ट्रोल करणं खूप सोप्प असतं. पण समोरची व्यक्ती काय अनुभवते आहे, तिच्या मनात काय चालू आहे हे आपण जाणत नाही.

पुढे अंकिता म्हणाली, ‘संवेदनशीलता आणि समजूतदारपणा या गोष्टी आजच्या काळात फार गरजेचे आहेत. राजकारणात टीका होणारच, प्रश्न विचारले जाणारच पण व्यक्तिगत दुःखावर उपहार करणं हे आपल्याच समाजाचं प्रतिबिंब दाखवतं. विचार वेगळे असू शकतात, मतभेद असू शकतात पण माणूसपण टिकवणं हीच खरी गरज आहे… सध्या अंकिताची पोस्ट सर्वत्र चर्चेत आहे.

सुनेत्रा पावर यांच्याकडे सोपवण्यात आलेली खाती

सुनेत्रा पवार यांना आता महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही तीन खाती देण्यात आली आहेत. तर अजित पवार यांचे अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाईल. सांगायचं झालं तर, सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.