AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक खरातचा एन्काऊंटर होणार? काँग्रेस खासदाराचा खळबळजनक दावा

सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ढोंगी बाबा अशोक खरात प्रकरणावरून खळबळजनक दावा केला असून, पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचे एनकाउंटर होऊ शकते, असे विधान केले आहे.

अशोक खरातचा एन्काऊंटर होणार? काँग्रेस खासदाराचा खळबळजनक दावा
Ashok Kharat
| Updated on: Apr 15, 2026 | 7:47 AM
Share

नाशिकमधील बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात फसवणूक आणि लैंगिक शोषण प्रकरणी नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. भोंदू बाबा अशोक खरात हे प्रकरण आता देशातील मोठ्या लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंग घोटाळ्यांपैकी एक मानले जात आहे. तंत्र-मंत्र आणि भविष्यवाणीच्या नावाखाली महिलांचे शोषण करणे, आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग करणे आणि करोडोंची फसवणूक करणे अशा गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. या प्रकरणी अनेक राजकीय लागेबांधे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी एक मोठा दावा केला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. भोंदू बाबा अशोक खरातचे धागेदोरे सत्तेत असलेल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात, त्यामुळे त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो, असे विधान प्रणिती शिंदे यांनी केले.

प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?

हे प्रकरण फक्त एका बाबापुरते मर्यादित नाही. या प्रकरणाचे धागेदोरे सत्तेत बसलेल्या काही बड्या नेत्यांपर्यंत पोहोचू शकतात. जर खरातने चौकशीदरम्यान या नेत्यांची नावे घेईल, तर ती माहिती बाहेर येऊ नये म्हणून त्याचे एन्काउंटर केले जाऊ शकते. म्हणजे, पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला मारले जाण्याची शक्यता आहे, असा मोठा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

अशोक खरातवर गुन्हा दाखल, ईडीकडून छापेमारी

दरम्यान ईडीने अशोक खरात आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. नाशिकमधील पाच, पुण्यातील तीन आणि शिर्डीतील तीन अशा एकूण ११ ठिकाणी एकाच वेळी कारवाई करण्यात आली. यावेळी एजन्सीने महत्त्वाचे दस्तऐवज, डिजिटल पुरावे आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. हे प्रकरण केवळ लैंगिक गुन्ह्यांपुरते मर्यादित नसून, मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

यापूर्वी या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांचे विशेष तपास पथक (SIT) करत होते. आतापर्यंत अशोक खरातवर विविध पोलीस ठाण्यांत लैंगिक शोषण, बलात्कार, फसवणूक, जमीन बळकावणे आणि अवैध मालमत्ता जमा करणे अशा गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल आहेत. सध्या पोलीस आणि ईडी मिळून या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करत आहेत. तपास यंत्रणांच्या मते, अशोक खरात आणि त्याच्या जवळच्या व्यक्तींच्या ५२ मालमत्ता सध्या तपासणीच्या कक्षेत आहेत. या मालमत्ता अवैध कमाईतून खरेदी केल्याचा संशय असून, फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगच्या पैशांचा वापर कुठे झाला, याचा ईडी मनी लाँड्रिंगच्या दृष्टीने शोध घेत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...