AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Goregaon Nesco Death : मुलगा ड्रग्स पार्टीत आरोपी तर बाप रेशन काळाबाजारात गुंतलेला, नेस्को ड्रग्स पार्टीत खुलासा…

गोरेगाव ड्रग्स प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेला आरोपी आनंद पटेल याचे वडील लखन पटेल हे देखील कुख्यात रेशनिंग माफिया असल्याचे उघडकीस आल्याने गुन्हेगारीत बाप आणि बेटा दोघेही सवाई असल्याचे पुढे आले आहे.

Goregaon Nesco Death : मुलगा ड्रग्स पार्टीत आरोपी तर बाप रेशन काळाबाजारात गुंतलेला, नेस्को ड्रग्स पार्टीत खुलासा...
kalyan crime
| Edited By: | Updated on: Apr 14, 2026 | 7:07 PM
Share

मुंबईतील गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये झालेल्या हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीत ओव्हरडोसमुळे झालेल्या दोघा  एमबीए स्टुडंटच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या आनंद पटेल याच्या अटकेनंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आनंद पटेल हाच केवळ ड्रग्स रॅकेटमध्येच अडकलेला नाही, तर त्याचे वडील लखन पटेल हे देखील कल्याणमधील मोठे ‘रेशनिंग माफिया’ म्हणून ओळखले जातात असे उघड झाले आहे. लखन पटेल यांच्यावर रेशनिंग धान्याचा काळाबाजार आणि संघटित गुन्हेगारी म्हणजेच ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई झाली असून बाप-लेकांच्या या गुन्हेगारी कनेक्शनमुळे कल्याणमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

दोघा एमबीएच्या विद्यार्थ्यांचा ओव्हरडोसने मृत्यू

मुंबईतील नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणाने राज्य हादरले आहे. ११ एप्रिल रोजी गोरेगावच्या नेस्को येथे झालेल्या ड्रग्स पार्टीला ४ हजार तरुण प्रत्येक दोन हजार रुपये फि भरुन हजर राहिले होते. यात एका २४ वर्षांची एमबीए तरुणी आणि २८ वर्षांचा एमबीए तरुण ओव्हरडोसमुळे आजारी पडले. नंतर त्यांचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पार्टी आयोजन प्रकरणात  कल्याणमधून अटक करण्यात आलेला आनंद पटेल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र,त्याचे वडील लखन पटेल देखील कल्याण आणि परिसरातील रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. रेशनिंग काळाबाजार प्रकरणात मोक्का अंतर्गत लखन पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे , आनंद पटेल राहत असलेल्या ‘मोहन हाईट्स’ मधील रहिवाशांना धक्का बसला आहे.

लखन पटेल हा कल्याण-डोंबिवली परिसरात रेशनिंग माफिया म्हणून ओळखला जातो. गरिबांच्या हक्काचे सरकारी धान्य गोदामातून चोरून खुल्या बाजारात चढ्या दराने विकण्याची मोठी साखळी त्याने तयार केल्याचा आरोप होत आहे. त्याच्या या संघटित गुन्हेगारीमुळे ठाणे पोलिसांनी त्याच्यावर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई केली होती. इतकेच नाही तर, सातत्याने गुन्हे करत असल्यामुळे त्याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती.

लखन पटेलवर असलेले गंभीर आरोप:

जीवनावश्यक वस्तू कायदा: रेशनच्या धान्याची अवैध साठवणूक आणि तस्करी

सरकारी कामात अडथळा: पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना धमकावणे आणि कारवाईत अडथळे आणणे

फसवणूक: भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२० आणि ४०६ नुसार फसवणुकीचे गुन्हे

पोलीस दप्तरी नोंद: कोळसेवाडी, बाजारपेठ आणि खडकपाडा पोलीस ठाण्यांत लखन पटेलवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत

रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण

नेस्को ड्रग्स पार्टीत आनंद पटेल याचे नाव आल्यानंतर आणि आता त्याच्या वडिलांचा गुन्हेगारी इतिहास पुन्हा चर्चेत आल्याने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. “बाप रेशन माफिया आणि मुलगा ड्रग्स माफिया” अशी चर्चा आता या परिसरात रंगली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने वेळोवेळी लखन पटेलच्या गोदामांवर छापे टाकून लाखो रुपयांचा माल जप्त केला होता. मात्र आता मुलाचे ड्रग्स प्रकरणात नाव आल्याने या कुटुंबाचे काळे साम्राज्य पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...