Kalyan Crime: टिटवाळ्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! वडील आणि भावावर गोळ्या झाडून मुलगा फरार, धक्कादायक कारण समोर

Son Opens Fire on Father and Brother: टिटवाळ्यात मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार घडल्याचे दिसून आले आहे. वडील आणि भावावर मुलाने गोळीबार केली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

Kalyan Crime: टिटवाळ्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! वडील आणि भावावर गोळ्या झाडून मुलगा फरार, धक्कादायक कारण समोर
Shooting in Titwala Over Land Dispute
| Updated on: Nov 11, 2026 | 5:29 PM

कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टिटवाळ्यात प्रॉपर्टीच्या वादातून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. मालमत्ता आणि जमिनीच्या वादातून मुलानेच आपल्या वडिलांवर आणि सख्ख्या भावावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना टिटवाळ्यातील गुरवलीपाडा गावात घडली आहे. या गोळीबारात वडील बाळाराम शेलार आणि भाऊ भरत शेलार गंभीर जखमी झाले आहेत. मंगळवारी (१० नोव्हेंबर) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे टिटवाळ्यासह कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्पेश बाळाराम शेलार याचा वडील बाळाराम शेलार आणि भाऊ भरत शेलार यांच्याशी मालमत्ता आणि जमिनीच्या कारणावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातून कुटुंबात वारंवार तणाव निर्माण होत होता. अनेक दिवसांपासून धुमसत असलेल्या या वादाचे अखेर गोळीबारात रूपांतर झाले. मंगळवारी रात्री संतापाच्या भरात कल्पेशने आपल्या वडिलांवर आणि भावावर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Loading...

या हल्ल्यात बाळाराम शेलार आणि भरत शेलार यांना गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. दोन्ही जखमींना तातडीने गोवेली रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यामधील एकाला पोटात गोळी लागली आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी कल्पेश शेलार घटनास्थळावरून पसार झाला. पांढऱ्या रंगाच्या कारमधून त्याने घटनेनंतर घटनास्थळावरून पळ काढला आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी कल्पेश शेलार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू आहे.

तसेच कल्पेशची पत्नी रसिका हिला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत तिची नेमकी भूमिका काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. मालमत्तेच्या वादातून थेट जन्मदात्या वडिलांवर आणि सख्ख्या भावावर गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमागील नेमके कारण, गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र आणि आरोपीच्या पत्नीची भूमिका यासह विविध बाबींचा तपास टिटवाळा पोलीस करत आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us