St workers strike : एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार, परिवहन खात्याच्या महत्त्वाच्या घोषणा : वाचा सविस्तर

| Updated on: Dec 21, 2021 | 9:10 PM

आगारातील वाहतूक पूर्ववत सुरु झाल्यानंतर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फे करण्यात आलेले त्यांना शिस्त आणि आवेदन कार्यपध्दतीनुसार बडतर्फी मागे घेण्यात येण्याचे आदेश दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

St workers strike : एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार, परिवहन खात्याच्या महत्त्वाच्या घोषणा : वाचा सविस्तर
अनिल परब, एसटी कर्मचारी आंदोलन
Follow us on

मुंबई : गेल्या 50 दिवसांहून अधिका काळ एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. काल अजय गुजर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबतच्या चर्चेनंतर संप मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर परिवहन मंत्री अनिल परब आणि अजय गुरज यांच्याकडून कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले. जे कर्मचारी कामावर हजर राहतील त्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणार असल्याची घोषणाही यावेळी अनिल परब यांनी केली आहे.

निलंबन, बडतर्फी, बदल्या मागे घेणार

या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी 22 डिसेंबर 2021 पर्यंत कामावर हजर व्हावं, जे कर्मचारी मराठवाडा, अमरावती आणि नागपूर विभागात कार्यरत आहेत, त्यांनी 23 डिसेंबर 2021 पर्यंत कर्तव्यावर हजर व्हावे, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. जे कर्मचारी विहित कालमर्यादित आगारात हजर होतील त्यांना कामावर हजर करून घेऊन काम देण्याचे आदेश महामंडळाला देण्यात आले आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. आगारातील वाहतूक पूर्ववत सुरु झाल्यानंतर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फे करण्यात आलेले त्यांना शिस्त आणि आवेदन कार्यपध्दतीनुसार बडतर्फी मागे घेण्यात येण्याचे आदेश दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे त्यांच्याबाबतीत कायदेशीररित्या सेवा समाप्ती मागे घेण्यात येणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या बदल्याही रद्द होणार

ज्या कर्मचाऱ्यांची संप कालावधीत अन्य ठिकाणी बदली करण्यात आली, त्या कर्मचाऱ्यांनी वेळेत मूळ आगारात हजर झाल्यानंतर त्यांचे बदली आदेश तात्काळ रद्द करण्यात येणार आहेत, अशी हमी परिवहन खात्याकडून देण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्याविरुद्ध संप कालावधीत गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्याबाबतीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हे मागे घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे याला कर्मचाऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो? तेही पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Thane : तुम्हाला मिळणारी हवा आणखी शुद्ध होणार, ठाणेकरांना अनेक नव्या योजनांचा लाभ

उद्धव ठाकरे चहापानाला गैरहजर, चंद्रकांत पाटील म्हणतात, आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या

Mumbai Crime: बादशाह मलिकला 24 डिसेंबरपर्यंत ईडी कोठडी, मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई