AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST Strike: एसटी संप मागे, गुणरत्न सतावर्ते यांची महाविकासआघाडीवर टीका

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. या संपातील सर्व संघटनांनी बिनशर्त संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ५००० रुपये वेतन वाढून मिळावे म्हणून हा संप पुकारला होता, पण सरकारने ६५०० हजारांची वाढ करत एसटी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. यावर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ST Strike: एसटी संप मागे, गुणरत्न सतावर्ते यांची महाविकासआघाडीवर टीका
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 04, 2024 | 9:59 PM
Share

एसटी संप मागे घेण्यात आला आहे. सर्व संघटनांनी पुकारलेला संप अखेर आज मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला आहे. यावेळी बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, ‘विचित्र आणि वाईट बुद्धीने बाप्पााच्या आगमनाआधी महाविकासआघाडीच्या सरकारने गणेश भक्तांना अडचणीत आणण्याचं काम केलं होतं. त्यांनी आज मुख्यमत्र्यांसमोर माफी मागितली आहे. त्या लोकांनी बिनशर्त आंदोलन मागे घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पगारात ६५०० रुपये वाढ केली आहे. सरकारने स्वताहून ही वाढ केली आहे. शरद पवारांच्या संघटनेच्या मागणी आधीच सरकारने स्वत:हून ६५०० रुपयांची वाढ केली आहे. सातवा वेतन आयोगाची मागणी जनसंघ संघटनेने लावून धरली होती. जनसंघाच्या मागणीला मान देत सरकारने पैसे वाढवले आहे.’

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावं ही प्रमुख मागणी होती. याशिवाय इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला होता. यावर आज तोडगा काढण्यासाठी सह्यादी गेस्ट हाऊसवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांच्या १३ संघटनांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या.

१ एप्रिल २०२० पासून सरसकट मूळ पगारात ६५०० रुपये इतकी वाढ देण्यात आली आहे. इतर मागण्यांबाबत ही सकारात्मक विचार असून त्यावरही तोडगा काढण्यात येईल, असं आश्वासनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना दिलं.

कालपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे गणेशोत्सव गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले असते. त्यामुळे तोडगा काढणं महत्त्वाचं होतं. आजच्या बैठकीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. समितीनं २०२० पासून सर्व कर्मचाऱ्यांसाठी सरसकट वेतनावाढ करावी अशी मागणी केली होती. जी सरकारने मान्य केलीये.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे