गृहमंत्र्यांनंतर गृहराज्यमंत्र्यांना कोरोनाची लागण, सतेज पाटील कोरोनाबाधित

| Updated on: Feb 09, 2021 | 2:53 PM

काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण झाली असून ते उपचार घेत आहेत. (Satej Patil Corona Positive)

गृहमंत्र्यांनंतर गृहराज्यमंत्र्यांना कोरोनाची लागण, सतेज पाटील कोरोनाबाधित
सतेज पाटील, गृहराज्यमंत्री
Follow us on

मुंबई: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना कोरोना झाल्यानंतर आता काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil)यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. सतेज पाटील यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. कोरोनावर मात करुन लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईन, असं सतेज पाटील म्हणाले आहेत. (State Minister of Home and Congress Leader Satej Patil tested corona Positive)

सतेज पाटील काय म्हणाले?

“माझी कोरोनाची चाचणी आज पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन.”, असं गृहराज्यमंत्री(शहरी) सतेज पाटील म्हणाले आहेत.

सतेज पाटलांचे ट्विट

गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याचं 2 फेब्रुवारीला समोर आलं होतं. गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली. अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी राज्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर होते. अनिल देशमुखांचा विदर्भ दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

अनिल देशमुखांचं ट्विट

दरम्यान, कोल्हापूर दक्षिणचे काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र, उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाले आहेत. ऋतुराज हे शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांचे नातू, तर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचे चिरंजीव. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे ते पुतणे आहेत. सतेज पाटलांनी गेल्या वर्षी धडाक्यात आपल्या पुतण्याचे लाँचिंग केले होते.

संबंधित बातम्या:

काँग्रेसची पहिली मोठी घोषणा, कोल्हापूरची निवडणूक स्वतंत्र लढणार

मोठी बातमी : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

(State Minister of Home and Congress Leader Satej Patil tested corona Positive)