AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC, HSC Exam | दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात बोर्ड करणार चौकशी

SSC, HSC Exam | बारावीची परीक्षा आता २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. ही परीक्षा १९ मार्चपर्यंत चालणार आहे. दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होत आहे. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मागील वर्षापेक्षा ही संख्या का वाढली? याची चौकशी बोर्ड करणार आहे.

SSC, HSC Exam | दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात बोर्ड करणार चौकशी
ssc exam
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 09, 2024 | 11:28 AM
Share

अभिजित पोते, पुणे , दि. 9 जानेवारी 2024 | दहावी, बारावीची परीक्षा यंदाही फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होत आहे. विद्यार्थी अभ्यासाची जोरदार तयारी करत आहे. त्याचवेळी परीक्षा मंडळाकडून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु या परीक्षेसंदर्भात आलेली आकेडवारीमुळे परीक्षा मंडळास चौकशी करावी लागणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मागील वर्षांपेक्षा वाढली आहे. अचानक विद्यार्थी संख्या कशी वाढली? यासंदर्भात आता मंडळ चौकशी करणार आहे.

मागील वर्षांच्या तुलनेत वाढ

बारावीची परीक्षा आता २१ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. ही परीक्षा १९ मार्चपर्यंत चालणार आहे. दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च दरम्यान होत आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात आले. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये सुरू केली होती. मागील वर्षी दहावीसाठी १५ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले तर बारावी परीक्षेसाठी १४ लाख २८ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. परंतु यंदा त्यात वाढ झाली आहे. दहावीची विद्यार्थी संख्या १६ लाख १० हजार झाली आहे. तर बारावीची संख्या १५ लाख १५ हजार झाली. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षीच्या तुलनेत वाढल्याचे दिसून आले आहे. दर वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या का वाढली, त्या मागे अन्य काही विशेष कारणे आहेत का, याची चौकशी मंडळ करणार आहे.

विद्यार्थी संख्येत आणखी होणार वाढ

दहावीचे सुमारे २५ हजार विद्यार्थी यंदा वाढले आहे. ते का वाढले आहेत, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी आणखी मुदत आहे. यामुळे या विद्यार्थिसंख्येत आणखी वाढ होणार आहे. दरम्यान दहावी, बारावीची परीक्षा काही दिवसांवर आली असताना राज्यभरातील शिक्षण संस्थाचालक पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहे. दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याची तयारी त्यांनी सुरु केली आहे. शासनाकडे रखडलेले शेकडो कोटींचे शिक्षकेतर अनुदान ही त्यांची प्रमुख मागणी आहे.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?