18 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवणाऱ्या सुभेदार राळे यांचा शौर्य पुरस्काराने सन्मान, खासदार अमोल कोल्हेंनेही दिल्या शुभेच्छा

18 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवणाऱ्या सुभेदार राळे यांचा शौर्य पुरस्काराने सन्मान, खासदार अमोल कोल्हेंनेही दिल्या शुभेच्छा
सुभेदार संतोष राळेंना शौर्य पुरस्कार
Image Credit source: social media

पवाड्यात कडाक्याच्या थंडीत आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी साथीदारांच्या सोबत या दहशतवाद्यांचा पाठलाग केला. त्यानंतर सहा दिवस चाललेल्या या चकमकीत 18 दहशतवादी ठार झाले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

May 28, 2022 | 3:48 PM

मुंबई – महाराष्ट्राच्या शौर्याच्या परंपरेतील आणखी एका शूरवीराचा गौरव स्वातंत्र्यवीर सावकर राष्ट्रीय स्मारकाच्या (Svatantrveer Savarakar Smarak)वतीने करण्यात आला. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी लढणाऱ्या आणि 18 दहशतवाद्यांना (18 terrorist killed) यमसदनी पाठवणाऱ्या एका मराठी शूरवीराचा हा गौरव होता. कीर्ती चक्र पुरस्कार वितेजे पराक्रमी निवृत्त सुभेदार संतोष राळे (Subhedar Santosh Rale)असं या शूरवीराचं नाव. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी शौर्य, विज्ञान आणि शिखर असे पुरस्कार दिले जातात. यंदा हा पुरस्कार सुभेदार संतोष राळे यांना देण्यात आला. याबाबत खसदार अमोल कोल्हे यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे.

ऑपरेशन रक्षकमध्ये प्लाटून कमांडर

जम्मू काश्मीर, अंदमान-निकोबार,भूतान आणि लेबनानमध्ये सुभेदार संतोष राळे हे सैन्यदलात कार्यरत होते. सैन्यदलातील पराक्रमी कामगिरीचा त्यांचा मोठा अनुभव आहे. ऑगस्ट 2008 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेशन रक्षक या योजनेंतर्गत त्यांच्याकडे प्लाटून कमांडरचा कार्यभार सोपवण्यात आला होता. या अधिकारपदावर कार्यकरत असताना, एका रात्री त्यांना 18 दहशतवादी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

ऑपरेशन नालनहार

22 ऑगस्ट 2008 रोजी त्यांना ही माहिती मिळाली. कुपवाड्यात कडाक्याच्या थंडीत आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी साथीदारांच्या सोबत या दहशतवाद्यांचा पाठलाग केला. त्यानंतर सहा दिवस चाललेल्या या चकमकीत 18 दहशतवादी ठार झाले. यातले तीन दहशतवादी खडतर स्थितीत संतोष राळे यांनी टिपले.

कीर्तीचक्र पुरस्काराचे मानकरी

18 दहशतवादी ठार मारल्याच्या या त्यांच्या पराक्रमाची नोंद सैन्यदल आणि सरकारने घेतली. 26 जानेवारी 2009 रोजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना कीर्ती चक्र पुरस्काराने गौरव करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

संतोष राळे यांची कारकीर्द

पुण्याच्या खेड तालुक्यातील संतोष राळे हे जवान आहेत. त्यांचे चुलते रमेश राळे आणि शहीद राजगुरु यांच्याकडून प्रेरणा घेऊन ते सैन्यात दाखल झाले. त्यांचे चुलते रमेश राळे हेही सैन्यदलातील जवान होते. ते चांगले खेळाडूही होते, त्यांच्याकडे पाहून शिक्षण अर्धवट सोडून राळे 27 ऑगस्ट 1994 रोजी त्यांनी सैन्यात प्रवेश घेतला.त्यानंतर त्यांनी सैनिकांचे प्रशिक्षण, कमांडो फोर्स आणि प्लाटून कमांडर कोर्स पूर्ण केला. त्यांच्या कुटुंबीयांनीही या काळात त्यांना मोलाची साथ दिली. त्यांचा गौरव शौर्य पुरस्काराने करण्यात आला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें