आंदोलनाची दिशा बदलली, उद्यापासून राज्यातील सारख कारखाने बंद, राजू शेट्टी यांची घोषणा

कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर आपल्याला जायचं आहे, आपल्याला हा साखर कारखाना बंद पाडायचा आहे. सांगली कडेगावला असणारा हा साखर कारखाना आपल्याला बंद पाडायचा आहे असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

आंदोलनाची दिशा बदलली, उद्यापासून राज्यातील सारख कारखाने बंद, राजू शेट्टी यांची घोषणा
Raju Shetti
| Updated on: Oct 14, 2026 | 6:55 PM

ऊस तोड मजूर आणि साखर कामगारांच्या सुरु असलेल्या आंदोलनाची दिशा बदलली आहे. उद्यापासून राज्यातील सर्व साखऱ कारखाने बंद करणार असल्याचे नेते राजू शेट्टी यांनी घोषीत केली आहे. आपण उद्यापासून आपण ऊसाचे ट्रॅक्टर,ट्रक अडवणार असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. कामगार साखर बाहेर जाऊ देणार नसल्याचे कामगार नेते राजू शेट्टी यांनी घोषीत केले आहे. याआधी २२ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता याबाबतचा निर्णय बदलला आहे.

उद्यापासून ऊसाचे ट्रॅक्टर ,ट्रक अडवणार असल्याचे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. आपण साखर बाहेर जाऊ देणार नाही. त्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय हे वाटणीवर येणार नाहीत असे कामगार नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

Loading...

आता उद्यापासूनच साखर कारखाने बंद पाडणार असल्याचे साखर कामगारांच्या वतीने राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. उद्या सकाळी १० वाजता रेठरे मधील कृष्णा कारखान्यावर जाऊन हा कारखाना आपण बंद पाडणार असल्याची घोषणा अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे. सध्या हायवे आणि रास्ता रोखो आंदोलन थांबवण्याचे राजू शेट्टी म्हटले आहे. उद्या आम्ही तीन कारखाने बंद पाडू असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

जोपर्यंत सर्व मागण्या पूर्णपणे मान्य होत नाहीत, तोपर्यंत 22 ऑक्टोबरपासून राज्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही,” असा कठोर इशारा तात्यासाहेब काळे यांनी दिला आहे. ​एकीकडे ऊसदरासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असताना, आता कामगारांच्या या संपामुळे राज्यातील साखर उद्योग पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाचा ऊस गाळप हंगाम वेळेत सुरू होणार की नाही, याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us