Sujay Vikhe Patil On Nila Vikhe Patil : स्वीडनमध्ये खासदार म्हणून निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांच्यावर भडकले सुजय विखे पाटील, थेट म्हटले, आम्ही कुठे फटाके वाजवत..

Sujay Vikhe Patil On Nila Vikhe Patil : विखे पाटील कुटुंबातील वाद पुढे येत आहे. नीला विखे पाटील स्वीडनमध्ये खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यानंतर त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला. आता सुजय विखेंनी यावर प्रतिक्रिया दिली.

Sujay Vikhe Patil On Nila Vikhe Patil : स्वीडनमध्ये खासदार म्हणून निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांच्यावर भडकले सुजय विखे पाटील, थेट म्हटले, आम्ही कुठे फटाके वाजवत..
Sujay Vikhe Patil Nila Vikhe Patil
| Updated on: Sep 27, 2026 | 11:55 AM

विखे कुटुंबातील वाद पुढे आला. नीला विखे पाटील स्वीडनमध्ये खासदार म्हणून निवडून आल्या. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतनीने थेट स्वीडनमध्ये नाव मोठे करत थेट खासदार झाल्याच्या बातम्या पुढे आल्या. त्यानंतर यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र, सुजय विखे पाटील यांनी थेट म्हटले की, त्यांचा पक्ष जर भारतात असता तर त्या खासदार म्हणून निवडून नसत्या आल्या. त्यानंतर सुजय विखे यांनी म्हटले की, एक विखे पाटील खासदार होऊ शकला नाही पण दुसरा विखे पाटील खासदार म्हणून निवडून आला. सुजय विखे पाटील यांच्या या विधानानंतर नीला विखे पाटील यांनी एक मुलाखत दिली. त्यांनी म्हटले की, काका राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजन विखे पाटील यांच्यासोबत गेल्या 10 ते 12 वर्षात कोणताच संबंध नाही. मी भारतात येते जाते पण मी त्यांना कधीच भेटत नाही.

मी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर काका राधाकृष्ण विखे पाटील यांचा मला फोन आला. मात्र, त्यापलीकडे आमच्या ना काैटुंबिक ना राजकीय संबंध नाहीत. त्यांच्याकडून माझ्या विजयाचे श्रेय लाटले जात आहे. यावर आता सुजय विखे पाटील यांनी मोठे विधान केले. त्यांनी थेट टीका करत म्हटले की, आम्ही कोणत्या विजयाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. आम्ही कुठे प्लेक्स लावले कुठे फटाके वाजवले.

राज्यात दुष्काळाचा गंभीर प्रश्न आहे.त्यात आमच्या काैटुंबिक विषयावर इतकी चर्चा का होत आहे? असा सवाल सुजय विखेंनी उपस्थित केला. नीला विखे पाटील स्वीडनमध्ये खासदार झाल्या हे माहिती नव्हते. पत्रकारांनी विचारले की,नीला विखे पाटील स्वीडनमध्ये खासदार म्हणून निवडून आल्या… तुमच्या भावना काय आहेत? मला फार वाईट वाटले असे तर म्हणून शकत नाही ना…

शेवटी त्या आमच्या कुटुंबातील सदस्य राहिल्या आहेत. आम्ही एकाच कुटुंबात राहिलेले आहोत. आमच्या कुटुंबातील सदस्य खासदार झाल्यावर आनंद झाला एवढेच मी म्हणालो. मी कार्यकर्त्यांसोबत बोलताना एका भाषणात मार्मिकतेने म्हणालो की, भारतात जरी एका विखे पाटलाचा पराभव झाला असला तरीही परदेशात विखे पाटील खासदार झाले. मान्य आहे, आमचे संबंध गेल्या काही वर्षांपासून काहीच नाहीत. पण यात श्रेय लाटण्याचा विषयच कुठे येतो. त्या स्वीडनमध्ये खासदार झाल्यानंतर आम्ही कुठे फटाके फोडले आणि प्लेक्स लावले होते, जे श्रेय लाटण्याचा आरोप केला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us