AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP | सर्वात मोठी बातमी, जयंत पाटील यांची राजकीय खेळी, आता सुप्रीम कोर्टात फैसला होणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे. असं असताना शरद पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेबाबत मोठी बातमी समोर आलीय.

NCP | सर्वात मोठी बातमी, जयंत पाटील यांची राजकीय खेळी, आता सुप्रीम कोर्टात फैसला होणार
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 06, 2023 | 4:52 PM
Share

नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दलची सर्वात मोठी बातमी समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नावाबाबत निवडणूक आयोगात आज पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आलीय. या याचिकेची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे.

जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आता तातडीने सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आज आठवड्यातील शेवटचा दिवस आहे. पुढचे दोन दिवस कोर्टाला शनिवार-रविवारची सुट्टी असणार आहे. पण त्यानंतर सोमवारी कोर्टाचं नियमित कामकाज सुरु होणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून सोमवारच्या याचिकांची यादी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेचा समावेश करण्यात आलाय.

याचिकेत नेमकं काय म्हटलंय?

जयंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या सोमवारी 9 ऑक्टोबरला सुनावणी पार पडेल. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेलं असेल. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांना राष्ट्रवादीच्या सर्वाधिक आमदारांनी पाठिंबा दिला होता. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय पक्षाच्या विरोधात आहे. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती.

जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेच्या प्रकरणी याचिका दाखल करुन दोन महिने झाले तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर कारवाई करण्यात यावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात केली आहे. त्यावर आता येत्या सोमवारी सुनावणी होईल. त्यामुळे सोमवारी सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्षांना काही आदेश देतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, याप्रकरणी आता शिवसेना सारख्याच घडामोडी घडताना दिसत आहेत.

Follow Us
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?