मुंबई, पुण्यातील घटना चिंताजनक, सुप्रिया सुळे यांनी पहिली मोठी प्रतिक्रिया, पुणे कोर्टाबाहेरील..

पुणे आणि मुंबई येथील घटना चिंताजनक असल्याचे मोठे विधान नुकताच सुप्रिया सुळे यांनी केले. सुप्रिया सुळे यांनी .राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. राज्यात पुण्यात नंबरची गुन्हेगारी आहे, हे केंद्र सरकारच्या डेटात आहे.

मुंबई, पुण्यातील घटना चिंताजनक, सुप्रिया सुळे यांनी पहिली मोठी प्रतिक्रिया, पुणे कोर्टाबाहेरील..
Supriya Sule
| Updated on: Nov 26, 2026 | 10:57 AM

संविधान दिन हा देशाच्या इतिहासात सोनेरी अक्षरात लिहलेला दिन आहे. बाबासाहेबांनी संविधान लिहलं आपण मोकळा श्वास घेतोय त्यामध्ये अनेकांचे कष्ट आहेत. असंख्य लोकांचे योगदान यामध्ये आहे. हा देश एकसंघ राहून प्रत्येक भारतीयांना संविधान दिल. जगातील सर्वश्रेष्ठ संविधान हे भारताच ओळखलं जात. मागच्या निवडणुकीत आपण पाहिलं जर कोणी संविधान बदलायचा प्रयत्न केला तर या देशात कोणी सहन करणार नाही. 26/11 हा अतिशय दुःख देणारा दिवस. हा हल्ला भारतावर होता. पण आता ज्या पद्धतीने महाराष्ट्र पोलीस काम करतय त्यांच्या कामाला सलाम करते.  आज संविधान दिन आहे पक्षाचे विषय पक्षाच्या कार्यालयात आहे. यासोबतच पुण्यातील घटनेवरही सुप्रिया सुळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.

सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, पुण्यात घडलेली घटना चिंताजनक आहे. राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. राज्यात पुण्यात नंबरची गुन्हेगारी आहे, हे केंद्र सरकारच्या डेटात आहे. मी काल मुख्यमंत्र्यांना विनंती केली. या काळ्यात आम्हाला आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत. आता सुरक्षितता महत्वाचा विषय आहे. त्यावर चर्चा घेणे आणि त्यातून मार्ग काढणे महत्वाचे आहे.

Loading...

आमची सहकार्याची भूमिका असेल. ज्यावेळी पहलगामवर हल्ला झाला, त्यावेळीही आम्ही गेलोच की. या देशातील 50 खासदार विदेशात गेले आणि आपल्या देशाची बाजू सांगितली. दुष्काळाबद्दल शरद पवारांनी पत्र दिले. त्यांनी काही सुचना केल्या, केलेल्या सुचना हळूहळू दिसत आहेत, सरकारकडून उपायोजना केल्या जात आहेत.

विरोधाला विरोध आम्ही करणार नाहीत. जीएसटी असेल महिला आरक्षण असेल हे विषय गांर्भियाने घेणे गरजेचे आहे. तू तू में मेंमध्ये आपण किती दिवस अडकणार आहोत. या देशामध्ये मोठे बदल आपण कधी करणार? मुंबई आणि पुण्यातील घटना चिंताजनक आहे. पुण्यातील हल्ल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाली आहेत. मंदार किवळे याच्यावर मोठा हल्ला झाला. अशा वर्दळीच्या ठिकाणी असा हल्ला होऊ शकतो, याचा कोणी साधा विचारही केला नव्हता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us