AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुरत बस एसटी अपघात: मृतदेह जळाल्याने ओळख पटेना, डीएनएचे नमूने घेण्यात येणार…

गुजरात राज्यातील सुरत शहरात एसटी महामंडळाच्या दोन बसेसच्या विचित्र अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात सात प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातातील मृतांबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करीत त्यांच्या कुटुंबियांविषयी सहवेदना व्यक्त केली आहे.

सुरत बस एसटी अपघात: मृतदेह जळाल्याने ओळख पटेना, डीएनएचे नमूने घेण्यात येणार...
surat st bus accident
| Updated on: Jun 02, 2026 | 10:34 PM
Share

राज्याच्या सीमेवरील सुरत येथे झालेल्या एसटी बसेसच्या विचित्र अपघातात चालकासह सात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त करीत मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहवेदना व्यक्त केली आहे. मृतांच्या वारसदारांना २ लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत PMNRF निधीतून जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, या भीषण अपघातातील मृतदेह संपूर्ण जळाल्याने त्यांची ओळख पटणे अवघड झाले आहे.त्यामुळे त्यांचे डीएनएचे नमूने घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सूरतमधील बारडोली येथील उवा गावामध्ये एसटीचा विचित्र अपघाताची भीषण घटना घडली आहे. या अपघातात सुरत ते धुळे मार्गावर एसटीची बस (बस क्रमांक एम.एच. १८ बीझेड १२५८) धावत होती. गुजरात हद्दीत व्याराजवळ मागून येणाऱ्या एका ट्रकने या बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे ही एसटी बस मार्गावरील दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूला कलंडली. याचवेळी त्याच मार्गावर जामनेर ते सुरत धावणाऱ्या ( बस क्रमांक एम.एच.२० बीएल ३३६० ) बसाला जोरदार धडक लागल्याने ही बस रस्त्याच्या खाली घसरून तिने अचानक पेट घेतला. या दोन्ही बसमधील चालकांचा मृत्यू झाला आहे. तर ५ ते ६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अंदाजे चार ते पाच प्रवाशांना गंभीर होरपळले असल्याची माहिती मिळाली आहे.

सुरत येथे एसटी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अधिकृत माहिती दिली आहे. अपघात झालेली बस ही जळगावच्या जामनेर आगाराची असून ती सकाळी साडेसात वाजता सुरतकडे रवाना झाली होती. या बसवरील चालक घन:श्याम बरकले यांचा अपघातात मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे. अपघातातील जखमींमध्ये एक प्रवासी जळगावच्या पाचोरा येथील असून ते सुखरूप असल्याची देखील माहिती त्यांनी दिली आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या प्रवाशाचे मृतदेह संपूर्ण जळालेले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही असेही जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले.

मयत व्यक्तींची ओळख पटलेली नसल्यामुळे ते नेमके कुठले आहेत हे अद्याप समोर आलेले नाही. त्यांचे डीएनए सँपल घेण्याचे काम सुरू असल्याचे घुगे यांनी सांगितले. सुरतमधील बारडोली येथील जिल्हाधिकारी तसेच प्रांताधिकारी यांच्याशी जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संपर्क साधला आहे.घटनेत जळगाव जिल्ह्यातील जखमी तसेच मयत व्यक्तीला जळगाव जिल्ह्यात आणण्यासाठी उपायोजना सुरू करण्यात आले असून एक टीम मदतीसाठी रवाना झाली आहे. अपघाताबद्दल नागरिकांनी कुठल्याही अफवा पसरवू नये तसेच अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

येथे पोस्ट पाहा –

पंतप्रधानांची सहवेदना आणि मदत

गुजरात मधील सुरत जिल्ह्यात झालेल्या अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी आपल्या सहवेदना व्यक्त केल्या आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना केली. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून प्रशासन अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत पुरवत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. पंतप्रधानांनी या अपघातातील मृताच्या वारसाला ‘पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी’ (पीएमएनआरएफ) मधून 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

दहा लाखांच्या मदतीची घोषणा

सुरत–धुळे आणि जामनेर -सुरत या एसटी बसेसना गुजरातच्या व्यारा येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. या कठीण प्रसंगी संपूर्ण एसटी परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. जखमी प्रवाशांवर मोफत आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश आपण दिले असल्याचे परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

Follow Us
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा