AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असं कोणतं ॲप आहे ज्यात नंबर टाकला की…, अंधारेंचा दमानियांवर जोरदार हल्लाबोल, सीडीआरवरून वातावरण तापलं

एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यामध्ये 17 फोन कॉल झाल्याचा दावा अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आला आहे. यावरून आता वातावरण तापलं असून, दमानिया यांच्यावर सुषमा अंधारे यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे.

असं कोणतं ॲप आहे ज्यात नंबर टाकला की..., अंधारेंचा दमानियांवर जोरदार हल्लाबोल, सीडीआरवरून वातावरण तापलं
Sushma Andhare, DamaniaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 05, 2026 | 6:14 PM
Share

अशोक खरात प्रकरणावर बोलताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा दावा केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अशोक खरात यांच्यामध्ये 17 वेळा फोन कॉल्स झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आपण सीडीआरच्या आधारे हा खुलासा केला अशी माहिती देखील त्यांनी दिली. दरम्यान अजंली दमानिया यांच्या या दाव्यामुळे राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे. अंजली दमानिया यांच्याकडे सीडीआर नेमके आले कसे? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अंजली दमानिया यांच्यावर ट्विट करत जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाल्या अंधारे? 

‘तुमच्या बाजूने किंवा तुमच्या विरुद्ध बोलल्याने फायदा नुकसान किंवा चर्चा होते अशा कुठल्याही भ्रमात राहू नका. गतकाळातल्या एका स्वयंघोषित समाजसुधारकाची तुम्ही सुधारित आवृत्ती आहात हे एव्हाना सगळ्यांना कळलेलेच आहे. मी तुम्हाला अगदी मुद्द्याचे प्रश्न विचारलेले आहेत. रूपाली चाकणकर यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झालीच पाहिजे. या प्रकरणाशी संबंधित कोणीही असो त्या कुणाचीही गय केली जाऊ नये हीच भूमिका आहे. पण हे सगळं बोलताना, तुम्ही मूळ प्रश्नाला बगल दिली तुम्हाला सीडीआर दिले कुणी? असा कोणता ॲप आहे ज्यामध्ये नंबर टाकल्यावर इनकमिंग आउटगोइंग कॉल ड्यूरेशन या सगळ्या गोष्टी मिळतात? तो कोण माणूस आहे ज्याच्या म्हणण्यावर तुम्ही इतका विश्वास टाकला या प्रश्नांना बगल का देताय ? बरोबर भाजपाचे प्रकरण आल्यावर तुमचे मित्र नातेसंबंध त्यांचे सुखदुःखाचे कार्यक्रम या सगळ्या गोष्टीत तुम्ही कशा काय व्यस्त होता? आणि एरवी मात्र तुम्ही दुबई अमेरिकेत आसाममध्ये कुठेही असाल तिथून अचानक प्रकट होता.. ?’ असं ट्विट करत अंधारे यांनी दमानिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

दरम्यान दुसरीकडे नाशिकमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सीडीआरवर प्रतिक्रिया दिली आहे. अशा पद्धतीने सीडीआर प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो अधिकार फक्त तपास यंत्रणांना आहे,  त्यामुळे हा सीडीआर लीक कसा झाला? याची चौकशी करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?