AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात शिक्षक मतदारसंघात कोणासोबत जाणार, भाजप की.. एकनाथ शिंदे यांनी सस्पेन्स संपवला

पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला आहे. भाजप आणि शिवसेनेत मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. एकनाथ शिदेंची शिवसेना सचिन सानप यांना पाठिंबा देणार आहे. ज्यामुळे हा भाजपाला मोठा धक्का म्हणावा लागेल.

पुण्यात शिक्षक मतदारसंघात कोणासोबत जाणार, भाजप की.. एकनाथ शिंदे यांनी सस्पेन्स संपवला
Pune Teacher Constituency
| Updated on: Oct 14, 2026 | 1:09 PM
Share

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीमध्ये वेगळी भूमिका दिसत आहे. या जागेसाठी एकनाथ शिंदे पहिल्या दिवसापासूनच आग्रही होते. मात्र, भाजपाही मागे हटण्यास तयार नव्हती. चिवटे यांनी एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यावर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. एकनाथ शिंदे यादरम्यान दिल्ली दाैऱ्यावरही गेले होते. मात्र, शेवटच्या क्षणी मोठी खेळी करण्यात आली. शिंदे सेनेकडून मंगेश चिवटे यांनी एबी फॉर्मही देण्यात आला होता. पण नंतर मंगेश चिवटे यांनी माघार घेतली. आता पुण्यात शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर शिंदे गट अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा देत आहे. काल याबाबत उशीरा नंदनवनमध्य घडामोडी घडताना दिसल्या. एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकही घेतली. हेच नाही तर एकनाथ शिंदे नाराज असल्याचाही जोरदार चर्चा रंगताना दिसली.

अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला आहे. भाजप आणि शिवसेनेत मैत्रिपूर्ण लढत होणार आहे. एकनाथ शिदेंची शिवसेना सचिन सानप यांना पाठिंबा देणार आहे. भाजप आणि इतर मित्र पक्ष कौस्तुभ गावडेंना पाठिंबा देणार आहेत. हा भाजपाला मोठा धक्का म्हणावा लागणार आहे. चिवटेंना शिवसेना शिंदे गटाने अर्ज मागे घ्यायला लावला पण काही फायदा झाला नाही.

महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या जोरदार चर्चा रंगताना दिसत होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीकडेही पाठ फिरवली. त्यातच रात्री शिवसेना शिंदे गटाचे महत्वाच्या नेत्यांची नंदनवन येथे बैठक झाली. शिंदे गट लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.

सचिन सानप हे उदय सामंत यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. शिवसेना शिंदे गटाकडून मंगेश चिवटे यांनी एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, एकनाथ शिंदेंच्या आदेशानंतर त्यांनी माघार घेतली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने थेटपणे सचिन सानप यांना पाठिंबा दिला. आता या लढतीकडे राज्याच्या नजरा लागल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट...
दुर्गा पूजेसाठी जात असताना भयंकर घडलं; ममता बॅनर्जींना थेट... मद्यधुंद महिलेचा धक्कादायक कारनामा