AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघांसाठी अखेर निवडणूक जाहीर..

Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. 23 ऑक्टोबर 2026 ला मतदान होणार आहे. 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल.

विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघांसाठी अखेर निवडणूक जाहीर..
Election
| Updated on: Sep 22, 2026 | 12:53 PM
Share

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. राज्यात 23 ऑक्टोबर 2026 ला मतदान होणार आहे. 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. गेल्या काही दिवसांपासून निवडणूक होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. निवडणूक आयोगाकडून संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले. याकरिता उमेदवारांना 6 ऑक्टोबर 2026 पर्यंत अर्ज ही करावी लागणार आहेत. अर्जांची छाननी ही 7 ऑक्टोबर 2026 रोजी होईल. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 ऑक्टोबर 2026 आहे. मतमोजणी आणि निकाल 27 ऑक्टोबर 2026 रोजी आहे.

राजकीय पक्ष निवडणुकीत पूर्ण तयारीने दाखल

आता सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अमरावती शिक्षक मतदार संघात भाजपकडून  शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत काळमेघ, खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे आणि शेखर भोयर यांचे नाव चर्चेत…तर काँग्रेसकडून ज्येष्ठ संपादक प्रकाश पोहरे यांची सून आदिती पोहरे यांचं नाव चर्चेत आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीने तापले राजकारण वातावरण

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचे राजकारण सध्या तापत आहे. अशातच वेळ पडल्यास भाजप म्हणून निवडणूक लढू. असे विधान करून जयकुमार गोरे यांनी पुणे मतदारसंघातील राजकारणात नव्या राजकीय समीकरणाबद्दल भाष्य केले. 2020 मध्ये निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सतीश चव्हाण यांना 1,16,638 मते तर भाजपाचे शिरीष बोराळकर 58,743 मते यांचा 57,895 मताधिक्याने पराभव झाला.

राजकीय समीकरणे बदलली भाजपा पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात 

सतीश चव्हाण यांचा हा सलग तिसरा विजय होता. पण आता 2020 चा विचार केला असता राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. आता मतदार संघात एम. के. देशमुख आणि किरण पाटील यांचेही नाते चर्चेत आहे. भाजपाने यंदा या निवडणुकीसाठी पूर्ण तयारी केली. भाजपा या निवडणुकीत तयारीने उतरत आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. याबाबत लवकरच उमेदवाराच्या नावाची घोषणा होईल.

Follow Us
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना मोठी हाक
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची...
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची शक्यता
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क..
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85 रुग्णवाहिका, 34 क्रेन अन्...
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकरी संकटात
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकऱ्याची व्यथा ऐकून डोळे पाणावतील
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत राऊत...
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचं विधान
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर... नेमकं काय घडलं?
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार