शाळेत 4 वर्षांपासून शिक्षक नाही; आमदार तानाजी सावंत संतापले, शिक्षण अधिकाऱ्याला चांगलंच झापलं; व्हिडिओ व्हायरल

शाळेत 4 वर्षांपासून शिक्षक नसण्यावरून आमदार तानाजी सावंत संतापले. सावंत यांनी शिक्षण अधिकाऱ्याला चांगलंच झापलं.

शाळेत 4 वर्षांपासून शिक्षक नाही; आमदार तानाजी सावंत संतापले, शिक्षण अधिकाऱ्याला चांगलंच झापलं; व्हिडिओ व्हायरल
| Updated on: Jul 31, 2026 | 9:55 AM

माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी गुरुवारपासून सर्वसामान्यांच्या प्रश्नावरून थेट अधिकाऱ्यांना फोनवरून विचारणा करू लागले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी थातुरमातूर उत्तर दिल्यानंतर त्वरित संताप व्यक्त करू लागले आहेत. माजी सावंत यांच्या फोनने शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तानाजी सावंत यांनी काल शेतकऱ्यांच्या पिकविम्यावरून तहसीलदारांना फोन केला. त्यानंतर आता शिक्षण अधिकाऱ्यालाही झापल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

धाराशिवच्या परांडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय. या प्रकरणाची आमदार तानाजी सावंत यांनी गंभीर दखल घेतली. त्यानंतर आमदार तानाजीराव सावंत यांनी जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी रवींद्र खंदारे यांना फोन वरून झापल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तानाजी सावंत हे समस्येवरून शिक्षण अधिकाऱ्याला जाब विचारत आहेत.

प्राथमिक शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकाराऱ्यांना झापताना तानाजी सावंत यांनी म्हटलं की, ‘तातडीने शाळेवरती शिक्षक पाठवा. “डॉक्युमेटेशन आणि कागदपत्राचे आम्हा लोकाला काही देणं घेणं नसतं. तात्काळ शिक्षक पाठवा, अशा कडक शब्दात आमदार तानाजी सावंत यांनी शिक्षण अधिकाऱ्याला सुनावलं. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड होऊ नये. शासन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत पूर्णपणे सजग आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केलं. त्यांनी सोनारी येथील शाळेत गणित विषयाच्या शिक्षकाची ताबडतोब नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. मतदारसंघातील लोकांच्या भावना पाहता आमदार तानाजी सावंत ऍक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे.

तानाजी सावंत यांनी तहसीलदारांना झापलं

आमदार तानाजी सावंत यांनी काल पिक विम्यावरून तहसीलदारांनाही चांगलंच झापलं. सावंत यांनी तहसीलदारांना म्हटलं की, आमच्या येथील शेतकऱ्यांना 700, 900 रुपये मिळत आहेत. तर काही भागात काही हजार मिळताहेत. हे कसं? रक्कमेत इतकी तफावत कशी काय आहे? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. त्यानंतर तहसीलदारांनी बघून घेतो असं म्हटलं. त्यानंतर तानाजी सावंत यांनी म्हटलं की, ‘अहो, बघून घेतो म्हणजे? लोक आत्महत्या करतील. लोक आंदोलने करतील. लोकांचे संसार उद्धवस्त होतील. आतापर्यंत तुम्ही बघितलं नाही? अशा शब्दात सावंत यानी झापलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us