Video | केमिकलने भरलेला टेम्पो उलटला, साताऱ्यात अनेकांच्या डोळ्यांना त्रास

पुणे-बंगळुरु महामार्गावर वाढे फाटा या ठिकाणी केमिकलने भरलेला पिकअप टेम्पो उलटाला आहे. (stara temop loaded chemicals overturned)

Video | केमिकलने भरलेला टेम्पो उलटला, साताऱ्यात अनेकांच्या डोळ्यांना त्रास
SATARA TEMPO ACCIDENT
| Updated on: May 30, 2021 | 11:25 PM

सातारा : पुणे-बंगळुरु महामार्गावर वाढे फाटा या ठिकाणी एक भंयकर घटना घडली आहे. या रस्त्यावर केमिकलने भरलेला पिकअप टेम्पो उलटला. मिळालेल्या माहितीनुसार या पिकअप टेम्पोमध्ये पिवळ्या रंगाच्या केमिकलच्या बॉटल्स होत्या. या बॉट्लस फुटल्यामुळे त्यातील केमिकल हवेत पसरले. ज्यामुळे अनेकांना उलटीचा त्रास झाला. तसेच काही लोकांच्या डोळ्यांना त्रास जाणवला. ( Temop loaded with Chemicals and Acid overturned in Stara on Pune Bangrulu highway)

नेमके काय घडले ?

पुणे-बंगळुरु महामार्गावर सातारा एमआडीसीकडे एक पिकअप टॅम्पो जात होता. या पिकअपमध्ये पिवळ्या रंगाचे केमिकल होते. अनेकजण हे अ‌ॅसिड असावे असा अंदाज बांधत आहेत. रस्त्यावरुन जात असताना चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटले. परिणामी हा पिकअप रस्त्यावरच उलटला.

प्रवाशांच्या डोळ्यांना त्रास, काही महिलांना उलटी

यावेळी या पिकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या केमिकलच्या बॉटल्स फुटल्या आणि त्यातून पिवळ्या रंगाचा धूर बाहेर निघू लागला. काही वेळानंतर हा धूर महामार्गावर पसरला. धूर पसरल्यामुळे रस्त्यावरील इतर प्रवाशांच्या डोळ्यांना त्रास जाणावू लागला. काही महिला प्रवाशांना तर रस्त्यावरच उलटी झाली.

पाहा व्हिडीओ :

काही काळासाठी वाहतूक खोळंबली

दरम्यान, हा प्रकार समोर येताच बाकीच्या प्रवाशांनी अग्निशमन दल तसेच पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर अग्निशमन दलाने पिकअपमधून निघत असलेल्या धुरावर नियंत्रण मिळवले. पिकअप रस्त्यावरच उलटल्यामुळे येथे काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

इतर बातम्या :

लॉकडाऊन सुरु असताना बंगल्यात डान्स पार्टीचं आयोजन, पुण्यात 13 तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल

14 वर्षांच्या मुलाकडून 13 वर्षांच्या मुलीची हत्या, पोटात 114 वेळा चाकू खुपसला

पोलीस उपनिरीक्षकांचे खोटे ओळखपत्र, वर्गमैत्रिणीसह अनेकांना गंडा, वसईत भामट्याला अटक

( Temop loaded with Chemicals and Acid overturned in Stara on Pune Bangrulu highway)