दुर्गाडी किल्ल्यावरुन ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने; कोणावर होणार देवीची कृपा?

कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सव कोण साजरा करणार यावरुन शिवसेना आणि शिंदे गट पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत.

दुर्गाडी किल्ल्यावरुन ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने; कोणावर होणार देवीची कृपा?
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 7:34 PM

मुंबई : शिवतीर्थ अर्था शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा(Shivsena Dasara Melava 2022) होणार यावरुन उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) आणि शिंदे गट यांच्यातील वाद शिगेला पोहचला आहे. त्यातच आता कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरुन(Kalyan Durgadi Fort) ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने आला आहे. यामुळे आता दुर्गाडी देवीची कृपा कोणावर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली आहे. राज्यात दसरा मेळाव्यावरून राजकारण रंगल असताना आता कल्याणात आणखी एक नवीन वादाची ठिणगी पडली आहे.

कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सव कोण साजरा करणार यावरुन शिवसेना आणि शिंदे गट पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत.

दोन्ही गटांच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे परवानगी मागितली आहे. जिल्हाधिकारी कोणाला परवानगी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दुर्गाडी किल्ल्याच्या निमित्ताने नवरात्री अगोदर कल्याणमध्ये राजकीय गरबा रंगला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा कोण पुढे सुरू ठेवणार? यावरून देखील चढाओढ निर्माण झाली आहे.

1968 साली कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर पूजा-अर्चाना करण्यासाठी बंदी हूकूम जारी करण्यात आले होते. या वेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपत्नीक बंदी हूकूम मोडून देवीची पूजा केली.

तेव्हापासून आजर्पयत दरवर्षी दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गाडी देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जातो. शिवसेनेच्या नियमाप्रमाणे किल्ले दुर्गाडी देवीच्या नवरात्र उत्सवाचा अध्यक्ष हा शहर प्रमुख असतो.

मात्र, शिंदेंचे बंड आणि त्यानंतरच्या सत्तांतरानंतर सर्व चित्र बदलल आहे. यंदा या उत्सवावर देखील शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट वादाचं सावट आहे.

उद्धव ठाकरे गटातील शिवसेना शहर प्रमुख सचिन बासरे यांच्यासह शिंदे गटातील शहर प्रमुख व विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे नवरात्र उत्सव साजरा करत पूजेचा मान देण्याची परवानगी मागितली आहे.

दोन्ही गटांकडून परवानगी आम्हालाच मिळणार असा दावा केला जातोय. त्यामुळे ही परवानगी कोणाला द्यावी यावर अजून जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा निर्णय दिलेला नाही.

मात्र, आता आत्ता जिल्हाधिकारी कोणाला परवानगी देणार आणि कोणावर देवीची कृपा होणार हे पाहव लागेल.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.