AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोमो स्टॉक कंपनीत ठाकरे परिवार पार्टनर, कंपनीतून 7 कोटींची मनी लॉन्ड्रिंग; Kirit Somaiya यांचा मोठा आरोप

भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी ठाकरे कुटुंबीयांवर आणखी एक मोठा आरोप केला आहे. कोमो स्टॉक अँड प्रॉपर्टीज प्रा. ही कंपनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या परिवाराने स्थापन केली आहे.

कोमो स्टॉक कंपनीत ठाकरे परिवार पार्टनर, कंपनीतून 7 कोटींची मनी लॉन्ड्रिंग; Kirit Somaiya यांचा मोठा आरोप
कोमो स्टॉक कंपनीत ठाकरे परिवार पार्टनर, कंपनीतून 7 कोटींची मनी लॉन्ड्रिंगImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 10:31 AM
Share

मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी ठाकरे कुटुंबीयांवर आणखी एक मोठा आरोप केला आहे. कोमो स्टॉक अँड प्रॉपर्टीज प्रा. ही कंपनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या परिवाराने स्थापन केली आहे. आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरेही त्यात पार्टनर झाले. 23 मार्च 2014ला ही कंपनी बनवली. नंतर नंदकिशोर चतुर्वेदीची (nandkishor chaturvedi) मदत घेतली. 7 कोटी रुपये फक्त कोमो स्टॉक मार्फत ठाकरे परिवाराने मनी लॉन्ड्रिंग केलं आणि 3 सप्टेंबर 2019 रोजी नंदकिशोर चतुर्वेदीला ठाकरे परिवाराने ही कंपनी विकली. या कंपनीचे पार्टनर नंदकिशोर चतुर्वेदी यांचा या कंपनीत 56 टक्के, लुक बॅनेटिक ऑस्ट्रेलियाचा 34 टक्के आणि इतरांचा 10 टक्के हिस्सा आहे. म्हणजे ठाकरे परिवार मनी लॉन्ड्रिंग करण्यात ऑस्ट्रेलियनचीही मदत घेत आहेत. हा सर्व घोटाळा मी ईडी, इन्कम टॅक्स आणि कंपनी मंत्रालयाला पाठवला आहे, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. सोमय्या यांच्या या नव्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

किरीट सोमय्यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला. मी सोमावारी परत दिल्लीत जाणार आहे. मी दिल्लीत गेलो तर इथले घोटाळेबाज सक्रिय होतात. सक्रियता इथे आहे. घोटाळेबाज चिंतीत होतात. अब किसका नंबर लगेगा असं त्यांना वाटतं, असा टोलाही किरीट सोमय्या यांनी लगावला. मी तर फकिर आहे. मला जनतेनं मोठं केलं आहे, असंही ते म्हणाले.

चतुर्वेदी कुठे हे आदित्य ठाकरेंना विचारा

दरम्यान, सोमय्या यांनी कालही या प्रकरणावरून ठाकरे कुटुंबावर आरोप केले होते. नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहे हे आदित्य ठाकरेंना विचारा. त्यांच्याच कंपन्यात यांची गुंतवणूक आहे. अनेक कंपन्या टेक ओव्हर केल्या गेल्या आहेत. त्यांनी बहुतेक चतुर्वेदीला वर्षी किंवा मातोश्रीवर लपवलं असावं, असा टोलाही त्यांनी लगावला. कर्जतला असेलेली हिंदू देवस्थानची जमीन श्रीधर पाटणकर यांनी घेतली आहे. त्यांनी अनेक जमिनींचे घोटाळे केले आहेत, पैसे ब्लॅकचे व्हाईट केले आहेत, असंही ते म्हणाले.

नवलानीचंही प्रकरण बाहेर येणार

माझ्यावर आरोप झाले, राकेश वाधवानशी संबंध असल्याचं सांगितलं गेलं. 7 जणांचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले. कोर्टाने सांगितलंय की नील सोमय्यांविरोधात काही पुरावे नाही. तो निर्दोष आहे. सरकारनं स्वत:चं हसं करून घेतंय. जितेंद्र नवलानीचंही प्रकरण लवकरच बाहेर येणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Mango : नुकसानीनंतरही फळांच्या ‘राजा’चा तोरा कायम, स्थानिक बाजारपेठेत हापूस दाखल..!

Maharashtra News Live Update : यांच्या घरात पेनड्राईव्ह बाळत होतात का ? एक कवर ड्राईव्ह सगळ्या पेनड्राईव्हला भारी पडेल – संजय राऊत

‘RRR’ first review | ‘RRR..’खतरनाक , Ram charan, Jr NTR यांचा फुल पैसा वसूल परफॉर्मन्स

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.