Ambedkar Jayanti 2023 : उल्हासनगरमध्ये बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी 2 कोटींचा निधी मंजूर

उल्हासनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शासनाकडून २ कोटी रुपयांचा निधी मंजूर मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली आहे.

Ambedkar Jayanti 2023 : उल्हासनगरमध्ये बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी 2 कोटींचा निधी मंजूर
| Updated on: Apr 13, 2023 | 10:06 PM

निनाद करमरकर, उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या जागी आता पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. कॅम्प ४ परिसरात हा पुतळा बसवण्यात येणार असून त्यासाठी शासनाकडून २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती शिवसेना आमदार डॉ. बालाजी किणीकर ( MLA Balaji Kinikar ) यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे हे देखील उपस्थित होते.

अर्धाकृती ऐवजी आता पूर्णाकृती पुतळा

उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील सुभाष टेकडी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ( DR. Babasaheb Ambedkar ) यांचा अर्धाकृती पुतळा आहे. या पुतळ्याच्या जागी आता पूर्णाकृती पुतळा बसवला जाणार आहे. यासाठी शासनाकडून १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून उर्वरित १ कोटी रुपये हे उल्हासनगर महानगरपालिकेकडून दिले जाणार आहेत. अशा २ कोटी रुपयांच्या निधीतून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जाणार आहे.

परिसर सुशोभीकरण ही होणार

सोबतच परिसरात सुशोभीकरण देखील केलं जाणार आहे. याबाबतची माहिती आज आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निधीला मंजुरी दिल्याबद्दल आमदार बालाजी किणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह उल्हासनगर मधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि पुतळा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.