Thane Musical Program : ठाण्यात 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान रंगणार आनंदोत्सव संगीत समारोह

| Updated on: Apr 19, 2022 | 6:27 PM

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान ह्या संस्थेमार्फत हा कार्यक्रम सादर केला जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष केदार बापट ह्यांनी सांगितले. हा संगीत समारोह 30 एप्रिल शनिवार व 1 मे रविवार ह्या दिवशी संपूर्ण दिवस गडकरी रंगायतन येथे संपन्न होणार आहे.

Thane Musical Program : ठाण्यात 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान रंगणार आनंदोत्सव संगीत समारोह
ठाण्यात 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान रंगणार आनंदोत्सव संगीत समारोह
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : ठाणे शहरात कायमच उत्तमोत्तम सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवर कलाकार इथे येऊन दर्जेदार कार्यक्रम सादर करीत असतात. त्याचप्रमाणे यावर्षी स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान ह्या नव्याने सुरू झालेल्या संस्थेने “आनंदोत्सव” (Anandostav) संगीत समारोहाची घोषणा केली आहे. माननीय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संगीत समारोह ठाण्यात 30 एप्रिल व 1 मे ह्या दोन दिवशी गडकरी रंगायतन येथे संपन्न होणार आहे. ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर, देवकी पंडित, आनंदगंधर्व आनंद भाटे, कौशिकी चक्रवर्ती, राकेश चौरसिया असे अनेक दिग्गज कलाकार ह्या संगीत समारोहात सहभाग घेणार आहेत. (Anandotsav music festival to be held in Thane from April 30 to May 1)

ह्या समारोहाचे निवेदन ज्येष्ठ सुप्रसिद्ध निवेदिका मंगला खाडिलकर, प्रसिद्ध निवेदक अभिनेता विघ्नेश जोशी आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री, कवयित्री, निवेदिका स्पृहा जोशी करणार आहेत. सोबतच ह्या कार्यक्रमामध्ये धनंजय म्हसकर, ओमकार प्रभुघाटे, शाल्मली सुखठणकर, कल्याणी जोशी, ऋतुजा लाड, गंधार जोग ह्यांचाही समावेश आहे.

कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करणार

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान ह्या संस्थेमार्फत हा कार्यक्रम सादर केला जाणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष केदार बापट ह्यांनी सांगितले. हा संगीत समारोह 30 एप्रिल शनिवार व 1 मे रविवार ह्या दिवशी संपूर्ण दिवस गडकरी रंगायतन येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. जास्तीत जास्त रसिकांनी कार्यक्रम पहावा यासाठी अतिशय माफक तिकीट दरामध्ये हा कार्यक्रम सर्वांना उपलब्ध होणार आहे. (Anandotsav music festival to be held in Thane from April 30 to May 1)

इतर बातम्या

Buldhana Accident : बुलढाण्यात मलकापूरजवळ भीषण अपघात, 3 ठार एक गंभीर

Pune Protest : पुण्यात कात्रज पाणी प्रश्न पेटला, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज