केडीएमसीत आता शिवसेनेविरोधात भाजपची पोस्टरबाजी, रविंद्र चव्हाण यांचा पालकमंत्र्यांवर निशाणा

| Updated on: May 27, 2021 | 11:46 PM

कल्याण डोंबिवली महापालिकेने एप्रिल महिन्यापासून घनकचरा व्यवस्थापन शुल्क वसुलीला सुरुवात केली आहे. मात्र, या वसुलीला भाजपने विरोध केला आहे (BJP MLA Ravindra Chavan slams KDMC and Minister Eknath Shinde through posters).

केडीएमसीत आता शिवसेनेविरोधात भाजपची पोस्टरबाजी, रविंद्र चव्हाण यांचा पालकमंत्र्यांवर निशाणा
Follow us on

डोंबिवली (ठाणे) : कल्याण डोंबिवली महापालिकेने एप्रिल महिन्यापासून घनकचरा व्यवस्थापन शुल्क वसुलीला सुरुवात केली आहे. मात्र, या वसुलीला भाजपने विरोध केला आहे. भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी या शुल्कावरून शहरामध्ये ठिकठिकाणी पोस्टर लावत थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी केडीएमसी प्रशासनावर देखील टीका केली आहे. “कचरा कर लादणाऱ्या केडीएमसीचा निषेध”, अशा शब्दात भाजपने पोस्टरबाजी केली आहे (BJP MLA Ravindra Chavan slams KDMC and Minister Eknath Shinde through posters).

केडीएमसीत थुकरटपणा कशाला? भाजपचा सवाल

काही दिवसांपूर्वीच भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी या कराच्या मुद्यावर पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि केडीएमसीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्यावर टीका केली होती. मात्र आता हा वाद आता आणखीन विकोपाला गेला आहे. पोस्टरच्या माध्यमातून केडीएमसीत थुकरटपणा कशाला? असा थेट सवाल भाजपान उपस्थित केलाय (BJP MLA Ravindra Chavan slams KDMC and Minister Eknath Shinde through posters).

नेमकं प्रकरण काय?

केडीएमसीने घनकचरा व्यवस्थापन कर वसूली एप्रिल महिन्यापासून सुरु केली आहे. मात्र केडीएमसीच्या या निर्णयाला भाजपने प्रचंड विरोध केला आहे. डोंबिवलीचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी ही वसूली त्वरीत रद्द केली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हा कर लागू करण्याचा निर्णय घेणा:या आयुक्तांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी केली आहे. प्रशासनाने हा निर्णय 2016 सालचा आहे. विविध महापालिकांनी हा कर लागू केल्याचे सांगत वसूल केला जाणार कर योग्यच आहे असे सांगितले आहे.

भाजप सरकारनेच जीआर काढला

घनकचरा व्यवस्थापन कर संदर्भात 2016 मध्ये केंद्र सरकारने जो नियम केला. त्याच्या आधारे भाजप सरकार असताना 11 जुलै रोजी 2019 रोजी घनकचरा व्यवस्थापन कर वसूल करण्याचा जीआर काढला होता. आता कल्याण डोंबिवली महापालिकेने एप्रिल महिन्यापासून हा कर नागरीकांकडून वसूल करण्यास सुरुवात केली आहे.

महापालिकेला वर्षाला 10 ते 12 कोटीचे उत्पन्न मिळणार

घनकचरा व्यवस्थापन कराच्या पोटी प्रत्येक दिवशी एका मालमत्ता धारकाकडून 2 रुपये याप्रमाणे महिन्याला 60 रुपये आणि वर्षाला 720 रुपये कर गोळा केला जाणार आहे. त्यातून महापालिकेस 10 ते 12 कोटीचे उत्पन्न मिळणार आहे. मात्र या केडीएमसीच्या निर्णयाला भाजप आमदार रविंद्र चव्हाण तीव्र विरोध आहे.

रविंद्र चव्हाण यांचा विरोध का?

“सध्या कोरोना काळात लोकांच्या माथी ही कर वसूली लादणो चुकीचे आहे. हा कर तातडीने रद्द करण्यात यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. ज्या आयुक्तांनी हा निर्णय घेतला त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी”, अशी मागणी रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.

हेही वाचा : रस्त्यावर लुटमारीचा धंदा बंद होताच सराईत गुन्हेगार टीसी बनला, प्रवाशाच्या सतर्कतेमुळे बिंग फुटलं