Kalyan Ganesh : गणेशोत्सवात मंडळांनी देशभक्तीचे देखावे तयार करावे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ याचे आवाहन

| Updated on: Aug 23, 2022 | 8:03 PM

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. गणेशोत्सव संपल्यावर एक कॅमेरा देशासाठी आणि एक कॅमेरा समाजासाठी ही संकल्पना राबवावा. हे कॅमेरे शहराच्या चौकात लावावेत.

Kalyan Ganesh : गणेशोत्सवात मंडळांनी देशभक्तीचे देखावे तयार करावे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ याचे आवाहन
पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ याचे आवाहन
Image Credit source: t v 9
Follow us on

ठाणे : आगामी गणेशोत्सव काळात प्रत्येक गणेश मंडळाने (Ganesh Mandal) देशभक्तीपर देखावे तयार करावे. तसेच मंडळांनी मंडपात सीसीटीव्हीचा (CCTV) वापर करावा. गणेशोत्सव संपल्यावर एक कॅमेरा (Camera) देशासाठी आणि एक कॅमेरा समाजासाठी ही संकल्पना राबवा. असे आवाहन कल्याण झोन तीनचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी गणेश मंडळाने केली आहे. गेले दोन वर्षे कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे गणेशोत्सव निर्बंधामध्ये साजरा करण्यात आला. मात्र कोरोनाचा प्रसार कमी झाल्यामुळे पुन्हा एकदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. त्यासाठीची अनेक गणेश मंडळांनी तयारी सुरू केली आहे. या गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा व पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. कल्याण झोन 3 पोलिसांनी 31ऑगस्ट रोजीपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या सदस्यांची बैठक ठेवण्यात आली.

मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावे

या बैठकीत शांतता समितीचे सदस्य, पदाधिकारी, डीसीपी सचिन गुंजाळसह एसीपी उमेश माने पाटील आणि सर्व पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय उपस्थित होते. यावेळी गणेशोत्सवाचे नियोजन, विसर्जन पॉईंट कोणते असतील. विसर्जन मिरवणुकीचा मार्ग कोणता असेल. या विषयी सर्व गणेश मंडळांना माहिती दिली गेली. यावेळी पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी गणेश मंडळाने देशभक्तीपर देखावे तयार करावे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावे. गणेशोत्सव संपल्यावर एक कॅमेरा देशासाठी आणि एक कॅमेरा समाजासाठी ही संकल्पना राबवावा. हे कॅमेरे शहराच्या चौकात लावावेत. असे आवाहन पोलीस उपायुक्त सिचन गुंजाळ यांनी केले आहे.

नवी मुंबईत 135 कृत्रिम तलाव

नवी मुंबई पालिका प्रशासनाने गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांवर नियोजन केले आहे. शहरात 135 असे तलावांचे नियोजन केले जाणार आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे शहरात गणेशोत्सव साधेपणाने निर्बंध घालून साजरा करण्यात आला होता. यावेळी प्रशासनाने मूर्ती विसर्जनासाठी सार्वजनिक तलाव व कृत्रिम तलावांचे नियोजन केले आहे. शहरात पारंपरिक 22 विसर्जन तलाव आहेत. तसेच 135 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. कृत्रिम तलावांत फक्त फ्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येणार आहेत.

हे सुद्धा वाचा