AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या आठवणीत सलमान खानला अश्रू अनावर, ‘इक्कीस’च्या स्क्रीनिंगला काय घडलं ?

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे नोव्हेंबर महिन्यात निधन झालं, मात्र 'इक्कीस' हा त्यांचा शेवटचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत असून त्याचं स्क्रीनिंग नुकतंच झालं. त्यावेळी अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली, धर्मेंद्र यांना खूप मानणार सलमान खानही यावेळी हजर होता. भाईजनाचा इमोशनल अवतार यावेळी पहायला मिळाला.

Dharmendra : धर्मेंद्र यांच्या आठवणीत सलमान खानला अश्रू अनावर, ‘इक्कीस’च्या स्क्रीनिंगला काय घडलं ?
सलमान खान झाला इमोशनलImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Dec 30, 2025 | 10:20 AM
Share

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आता या जगात नाही. 24 नोव्हेंबर रोजी त्याचं मुंबईत निधन झालं. ते आता आपल्यात नसले तरी त्यांचे चित्रपट, गाणी या रुपाने ते नेहमी सोबत असतील. धर्मेंद्र (Dharmendra) यांनी काम केलेला, त्यांचा शेवटचा चित्रपट “इक्कीस” हा लवकरच प्रदर्शित होत असून तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट बऱ्याच अर्थांनी महत्वाचा आहे. “इक्कीस” मध्ये चाहते धर्मेंद्र यांना शेवटचा मोठ्या पडद्यावर पाहतील. धर्मेंद्र यांच्यासोबत, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील या चित्रपटात असून त्याची महत्वाची भूमिका आहे. काल म्हणजेच 29 डिसेंबरला या चित्रपटाचं स्क्रीनिंग पार पडलं, ज्यावेळी बॉलिवूडचे अनेक स्टार, सेलिब्रिटी आवर्जून उपस्थित होते. सलमान खान (Salman Khan) यावेळी हजर होता, धर्मेंद्र यांच्या आठवणीत भावूक झालेल्या भाईजनाच्या डोळ्यात यावेळी अश्रू तरळले.

‘इक्कीस’चं खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं, या स्क्रिनिंगला अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते आणि अभिनेत्याचे पोस्टर पाहून ते सर्व भावुक झाले होते. धर्मेंद्र यांचे पुत्र सनी देओल आणि बॉबी देओल हे देखील स्क्रिनिंगला उपस्थित होते आणि ते खूप भावूक झाले होते. यावेळी सलमाननेही हजेरी लावली होती. सलमान खान आणि धर्मेंद्र यांचे एक खास नाते होते. त्यांचा बाँड खूप खास होता, म्हणूनच सलमान खाननेही “इक्कीस” च्या स्क्रीनिंगलाही हजेरी लावली होती. स्क्रीनिंग दरम्यान, “इक्कीस” च्या पोस्टरसमोर उभा राहिलेला सलमान खान भावनिक झाल्याचं दिसलं.

सलमान खान झाला इमोशनल

कडक सुरक्षेत सलमान खान स्क्रिनिंगला पोहोचला. धर्मेंद्र यांच फोटो पोस्टरवर पाहताच तो भावुक झाला. तो क्षणभर थांबला, अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पोस्टरकडे पाहत राहिला आणि नंतर एकही शब्द न बोलता निघून गेला. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचे निधन झाले, त्या बातमीने संपूर्ण देशाला धक्का बसला. धर्मेंद्र हे सलमान खानसाठी वडिलांसारखे होते. बिग बॉस 19 च्या अंतिम फेरीत देखी सलमान खान धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला. “आपण ही-मॅनला गमावलं आहे. आपण सर्वात अद्भुत माणूस गमावला आहे. मला वाटत नाही की धरमजींपेक्षा चांगला कोणी असेल. त्यांनी ज्या पद्धतीने आयुष्य जगले ते अगदी भव्य होतं” असं सलमानने तेव्हा म्हटलं होतं.

रेखा यांचा अनोखा अंदाज

इक्कीसच्या स्क्रीनिंगला सलमान खान इमोशनल अंदाजात दिसला तर दुसरीकडे या स्क्रीनिंगला आलेल्या अभिनेत्री रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्या नातवावर प्रेमाचा वर्षाव केला. रेखा अनेकदा नवीन कलाकारांचं कौतुक करताना दिसतात. हा अगस्त्यचा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे रेखा यांनी अगस्त्यच्या पोस्टरवर प्रेमाचा वर्षाव केला. त्यांनी अगस्त्य नंदाच्या पोस्टरचं चुंबनही घेतलं.

कधी रिलीज होणार चित्रपट ?

सृजितम राघवन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून तो एक वॉर ड्रामा आहे. ‘ हा चित्रपट सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल यांच्या शौर्यावर आधारित आहे, त्यांना शौर्यासाठी परमवीर चक्र मिळाले होते, हा सन्मान मिळालेले ते सर्वात तरुण प्राप्तकर्ते होते. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्राणाचे बलिदान दिलं. या चित्रपटात अगस्त्य नंदा, धर्मेंद्र, जयदीप अहलावत आणि सिमर भाटिया यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 1 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...