कळवा पुलाच्या लोकार्पणावेळी शिंदे-आव्हाड यांच्यामध्ये श्रेयवाद, कार्यकर्तेही आमनेसामने

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, अडीच वर्षे सरकारमध्ये असताना काय केलं. यावर आव्हाड म्हणाले,

कळवा पुलाच्या लोकार्पणावेळी शिंदे-आव्हाड यांच्यामध्ये श्रेयवाद, कार्यकर्तेही आमनेसामने
| Edited By: | Updated on: Nov 13, 2022 | 8:01 PM

ठाणे : कळवा पुलाच्या लोकार्पणावरून खासदार श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये श्रेयवाद सुरू होता. कार्यकर्तेही आमनेसामने आले होते. पाच वर्षांपूर्वी मी देवेंद्र फडणवीस यांनी विनंती केली होती. असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. तर मागील अडीच वर्षात पुलाच्या कामाचं काय झालं होतं, असा सवाल खासदार श्रीकांत शिंदे विचारतात. मागच्या अडीच वर्षात नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडंच होतं, असं प्रत्युत्तर आव्हाड यांनी दिलं.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, याच्यात दोन प्रमुख मागण्या आम्ही पूर्वीपासून करतोय. कळव्यात उतरतो तिथून एक लेफ्ट टर्न घेऊन आठ लेनचा हायवे येतो. त्याला जॉईन केला तर टोलनाक्यापर्यंत रस्ता क्लीअर होतो. त्यामुळं जे कळव्यात, खारेगावला जाणारी आहेत ती इथून जाणार नाहीत. म्हणजे कळव्याचं ट्रॅफिक जॅम कमी होईल. ही विनंती मी देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्षांपूर्वी केली होती. आता मुख्यमंत्री शिंदे यांनाही विनंती करतो आहे.

यावर खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले, अडीच वर्षे सरकारमध्ये असताना काय केलं. यावर आव्हाड म्हणाले, अडीच वर्षे कोविडमध्ये होती ना. यावर स्टेजवर एकच हशा पिकला. आणि विभाग एकनाथ शिंदे यांच्याकडं होता. बोलायला लावू नका, असंही आव्हाड यांनी सांगितलं.

युडी यांच्याकडं आहे. एमएसआरडीसी यांच्याकडं आहे. अपेक्षाही तुमच्या यांच्याकडं आहेत. कारण हेच पैसे देणार आहेत, असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. पीडब्लूडी तुमच्याकडं होत, कळलं का, असंही त्यांनी सांगितलं. पुढेची आम्ही घेणारचं आहोत. आणि महापालिका सक्षम आहे.