AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात प्रथमच व्हर्च्युअल मॅरेथॉन, स्पर्धेचं आयोजन नेमकं कसं? वाचा सविस्तर

ठाणे महापालिकेच्यावतीने घेण्यात येणारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा प्रथमच व्हर्च्युअल पध्दतीने 21 ते 24 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर गेले 2 वर्षे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होवू शकली नाही.

ठाण्यात प्रथमच व्हर्च्युअल मॅरेथॉन, स्पर्धेचं आयोजन नेमकं कसं? वाचा सविस्तर
| Edited By: Chetan Patil | Updated on: Oct 09, 2021 | 12:00 AM
Share

ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने घेण्यात येणारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा प्रथमच व्हर्च्युअल पध्दतीने 21 ते 24 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर गेले 2 वर्षे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होवू शकली नाही. परंतु या परंपरेत खंड पडू नये तसेच खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी यंदा व्हर्च्युअल ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन कोविड 19 च्या सर्व नियमांचे पालन करुन होणार असल्याची माहिती महापौर नरेश गणपत म्हस्के यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आयोजित केलेल्या या पत्रकार परिषदेस उप महापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होते.

स्पर्धा नेमकी कशी होणार?

व्हर्च्युअल पद्धतीने होणाऱ्या या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये स्पर्धक जमावामधून न धावता स्वतंत्ररित्या धावणार आहेत, त्यामुळे गर्दी होणार नाही हा या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश आहे. या स्पर्धेसाठी मे. फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे स्पर्धक AFS by Decathlon या ॲपवर ऑनलाईन नोंदणी करुन वैयक्तिकरित्या धावणार आहेत. या ॲपवर स्पर्धा सुरू केल्याची व स्पर्धा संपल्याची नोंद होणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

स्पर्धा आठ गटात होणार

ही स्पर्धा आठ गटात होणार आहे. स्पर्धेसाठी 21 वर्षावरील पुरूष व महिलांसाठी 21 किमी, 18 वर्षावरील पुरुष व महिलांसाठी 10 किमी, 15 वर्षावरील मुले व मुलींसाठी 5 किमी तर 12 वर्षावरील मुले व मुली यांच्याकरिता 3 किमी इतके अंतर ठेवण्यात आली आहे. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांमधून लॉटरीद्वारे प्रत्येक गटातून तीन विजेते काढण्यात येणार आहे.

सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास पदक आणि प्रमाणपत्र

विजेत्या स्पर्धकांना ठाणे महापालिकेकडून मेडल्स व मे. डेकॅथलॉन स्पोर्टस इंडिया प्रा.लि. यांच्याकडून भेटवस्तू व ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सहभागी प्रत्येक स्पर्धकास पदक व ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धेसाठी मे. डेकॅथलॉन स्पोर्टस इंडिया लि. हे स्पोर्टस पार्टनर म्हणून लाभले आहेत. ॲपवर ऑनलाईन नोंदणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास 9820536374 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. यंदा प्रथमच व्हर्च्युअल पध्दतीने होणाऱ्या या ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के यांनी केले आहे.

हेही वाचा :

ठाणे पालिकेचा ठेकेदाराला दणका, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे तब्बल 10 लाखांचा दंड

गरीब असले म्हणून काय झालं? माणूसच आहेत, फिजिशियन नाही म्हणून गरोदर महिलेला चार तास ताटकळत बसवलं?

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या