AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे पालिकेचा ठेकेदाराला दणका, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे तब्बल 10 लाखांचा दंड

ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या मे. बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारास मोठा दंड ठोठावला आहे. गुणवत्तापूर्ण काम न केल्याप्रकरणी या ठेकेदारास 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आलाय.

ठाणे पालिकेचा ठेकेदाराला दणका, रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे तब्बल 10 लाखांचा दंड
THANE MUNICIPAL CORPORATION AND POTHOLES
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 12:02 AM
Share

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या मे. बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारास मोठा दंड ठोठावला आहे. गुणवत्तापूर्ण काम न केल्याप्रकरणी या ठेकेदारास 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आलाय. तशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिली आहे.

निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे ठेकेदाराला 10 लाखांचा दंड

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या खड्ड्यांची पाहणी केली होती.  कामे दर्जा राखून योग्य न झाल्याबाबत व नागरिकांची गैरसोय झाल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने निविदाकारांना तातडीने कामे करण्याबाबत तसेच त्यांच्याविरोधात कारवाई  करण्याबाबत बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली होती. परंतु दिलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण काम न केल्याने संबंधित ठेकेदारास तब्बल 10 लाख रुपयांचा दंड महापालिका प्रशासनाने ठोठावला आहे.

वेळोवेळी सूचना देऊनही रस्त्यांची दुरुस्ती केली नाही

संबंधित ठेकेदाराची पावसाळ्यात रस्त्यातील खड्डे भरुन व तात्पुरती दुरुस्ती करुन रस्ता वाहतुकीयोग्य ठेवणे ही जबाबदारी आहे. संबंधित कार्यकारी अभियंता यांनी वेळोवेळी सूचना देऊनही काम न केल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे दिसून आले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. तसेच या रस्त्यावर केलेले काम काही ठिकाणी काही दिवसातच नादुरुस्त झाले आहे.

ठेकेदारास बाजू मांडण्याचीही देण्यात आली संधी

ठाणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिलेल्या सूचनेनुसार ठराविक वेळेत, काम पुर्ण केले नसल्याने निविदेतील अटी व शर्तीनुसार दंडात्मक कारवाई करणेबाबत 3 दिवसात खुलासा करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारास देण्यात आले होते. सदर कामासोबतच 3 दिवसाच्या कालावधित कार्यालयाने दिलेल्या सूचनेनुसार नौपाडा कोपरी प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती व वर्तकनगर प्रभाग समितीमधील देखील खड्डे दुरुस्तीचे काम योग्य गुणवत्ता राखून काम पूर्ण करण्याचेही आदेशात सांगण्यात आले होते. मात्र, पावसाळ्यात रस्ता वाहतूक योग्य न राखल्यामुळे तसेच दिलेल्या वेळेत गुणवत्तापूर्ण काम न केल्यामुळे मे.बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारास  10 लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.

इतर बातम्या :

मराठी शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी वसई-विरार महापालिकेकडून बसची सोय, बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

उल्हासनगरमध्ये पुन्हा अज्ञात मृतदेह सापडला, डोक्याला इजा, हत्येचा संशय

कुठे आरती तर कुठे हरहर महादेवचा जयघोष… दीड वर्षानंतर ठाणे जिल्ह्यात दिसला भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम

(Thane Municipal Corporation take action against contractor Bitcon India Infrastructure Developers who repair raod)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.