स्वबळावर लढूनही भाजप नंबर 1, पण आघाडीची डोकेदुखी कायम; मनसेची साथ हवीच?

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे कल हाती आले आहेत. त्यानुसार पक्षनिहाय आकडेवारी पाहिल्यास भाजप स्वबळावर लढूनही नंबर वन ठरला आहे. (bjp single largest party in maharashtra zp and panchayat samiti election)

स्वबळावर लढूनही भाजप नंबर 1, पण आघाडीची डोकेदुखी कायम; मनसेची साथ हवीच?
panchayat samiti election
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 1:44 PM

ठाणे: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे कल हाती आले आहेत. त्यानुसार पक्षनिहाय आकडेवारी पाहिल्यास भाजप स्वबळावर लढूनही नंबर वन ठरला आहे. मात्र, आघाडी आणि युतीच्या आकडेवारीकडे पाहिल्यास महाविकास आघाडीने भाजपला पिछाडीवर टाकल्याचं दिसत आहे. त्यामुळे तीन पक्षांच्यासमोर भाजपचा टिकाव लागत नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं असून भाजपला आगामी काळात म्हणून मित्र पक्ष म्हणून मनसेला सोबत घ्यावं लागणार का? असा सवाल केला जात आहे.

जिल्हा परिषदेच्या 85 जागांपैरी 76 जागांचे कल हाती आले आहेत. त्यापैकी 19 जागांवर भाजपने आघाडी घेऊन आपणच राज्यात नंबर वन असल्याचं दाखवून दिलं आहे. तर काँग्रेसने 16, राष्ट्रवादीने 14, शिवसेनेने 11 आणि इतरांनी 15 जागांवर आघाडी घेतली आहे. तर आघाडी आणि युतीनिहाय आकडेवारी पाहता महाविकास आघाडीने 42, भाजपने 19 आणि इतरांनी 15 जागांवर आघाडी घेतली आहे.

पंचायत समितीचा कौल काय?

पंचायत समितीच्या 144 पैकी 66 जागांचे कल हाती आले आहेत. पक्षनिहाय आकडेवारी पाहता पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपने वर्चस्व मिळवलं आहे. भाजपने 22, काँग्रेसने 18, शिवसेना 9, राष्ट्रवादीला 8 आणि इतरांना 9 जागांवर आघाडी मिळाली आहे. तेच आघाडी आणि युतीची आकडेवारी पाहता महाविकास आघाडीला 35, भाजपला 22 आणि इतरांना 9 जागांवर आघाडी मिळाली आहे.

नेमकी माशी कुठे शिंकली?

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत अनेक ठिकाणी महाविकास आघाडीची आघाडी होती. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष स्वबळावर लढले. तर भाजपने रिपाइं, रयत क्रांती संघटना आणि इतर छोट्या पक्षांना सोबत घेऊन जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवल्या होत्या. पक्ष म्हणून भाजपला या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं आहे. पण युती म्हणून भाजप पिछाडीवर गेली आहे. त्यामुळे नंबर वन पक्ष असूनही उद्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत सत्ता मिळवताना भाजपला नाकीनऊ येणार आहेत. अधिक जागा असूनही केवळ आघाडीच्या राजकारणामुळे भाजपला जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीतील सत्तेतून वंचित राहावं लागणार आहे.

मनसेही मजबुरी

आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीतही हेच चित्रं राहिल्यास भाजपला कायमच सत्तेपासून दूर राहावं लागणार असल्याचं चित्रं आहे. त्यामुळे भाजपला सत्तेत जाण्यासाठी मनसेला सोबत घ्यावं लागणार आहे. त्याशिवाय भाजपला बेरजेचं राजकारण करता येणार नाही. तसेच सत्तेचा सोपानही चढता येणार नाही. मनसेशी युती ही आता भाजपची मजबुरी झाली आहे, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

जिल्हापरिषद 85 पैकी 76 जागांचे कल

भाजप-19 राष्ट्रवादी- 15 शिवसेना-11 काँग्रेस-16 इतर- 15 ——————- मविआ- 42 भाजप -19 इतर – 15

पंचायत समिती 144 पैकी 66 जागांचे कल

भाजप- 22 शिवसेना- 9 राष्ट्रवादी -8 काँग्रेस -18 इतर- 9 ————— मविआ- 35 भाजप- 22 इतर- 9

संबंधित बातम्या:

Maharashtra ZP and Panchayat Election Results 2021 LIVE: जिल्हा परिषद-पंचायत समितीचा निकाल, गुलाल कुणाचा?, राज्याचं लक्ष!

शिवसेनेला सर्वात मोठा धक्का, खासदारपुत्राचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत पराभव

Nandurbar election result 2021 : दीदी जिंकली, दादा हरला, माजी मंत्र्यांच्या मुलीचा विजय, पुतण्या पराभूत

(bjp single largest party in maharashtra zp and panchayat samiti election)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.