Nandurbar election result 2021 : दीदी जिंकली, दादा हरला, माजी मंत्र्यांच्या मुलीचा विजय, पुतण्या पराभूत

नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. माजी मंत्री आणि भाजपचे बडे नेते विजयकुमार गावित यांच्यासाठी कही खुशी, कही गम असं चित्र आहे. कारण मुलगी सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला असताना, पुतण्याचा मात्र पराभव झाला आहे.

Nandurbar election result 2021 : दीदी जिंकली, दादा हरला, माजी मंत्र्यांच्या मुलीचा विजय, पुतण्या पराभूत
Vijaykumar Gavit
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Oct 06, 2021 | 12:27 PM

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. माजी मंत्री आणि भाजपचे बडे नेते विजयकुमार गावित यांच्यासाठी कही खुशी, कही गम असं चित्र आहे. कारण मुलगी सुप्रिया गावित यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवला असताना, पुतण्याचा मात्र पराभव झाला आहे. विजयकुमार गावित यांचा पुतण्या पंकज गावित (Pankaj Gavit) यांचा शिवसेनेचे उमेदवार राम चंद्रकांत रघुवंशी यांनी पराभव केला.

कोपर्ली गटात शिवसेनेने विजयाचा श्नीगणेशा केला. राम रघुवंशी यांनी पंकज गावित यांचा 3 हजार 2 मतांनी पराभव केला. एकीकडे विजयकुमार गावित यांच्या मुलीचा विजय झाला असताना, दुसरीकडे पुतण्या हरल्याने नंदुरबारमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

नंदुरबारमध्ये दुसरा धक्का

दरम्यान भाजपला रणाडा गटातून शिवसेनेचा आणखी एक उमेदवार विजयी झाला. शिवसेनेच्या शकुंतला शिंत्रे यांनी 1373 मतांनी विजयी मिळवला. त्यांनी भाजपच्या रिना पांडुरंग पाटील यांचा पराभव केला. भाजपसाठी नंदुरबारमध्ये हा दुसरा धक्का आहे.

सुप्रिया गावित यांचा विजय 

दरम्यान, विजयकुमार गावित यांच्या कन्या सुप्रिया गावित यांनी कोळदा गणात विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार समीर पवार यांचा पराभव केला.

या विजयानंतर खासदार हीना गावित म्हणाल्या, “माझी जबाबदारी आणखी वाढली, माझी लहान बहीण जिंकली, मतदारसंघाचा विकास करताना या भागाचा विकास जबाबदारी आहे. सगळ्यांच्या मतदारसंघातील विकास मला जोमाने करावा लागणार आहे, मागच्या निवडणुकीत ११ पैकी ७ जिंकून आले होते, यावेळी तो आकडा क्रॉस करु” असा विश्वास हीना गावित यांनी व्यक्त केला.

तर माजी मंत्री विजयकुमार गावित म्हणाले, “या जिल्ह्यात आम्ही विकास करतोय, त्यामुळे जनतेचा विश्वास आहे. जिल्हा परिषदेत सर्व ५ आणि पंचायत समितीतही ५ उमेदवार निवडून येतील”

हिना गावित यांची के सी पाडवींवर टीका

भाजपा खासदार हिना गावितांची आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवींवर टीका, सगळे मतदारसंघ सगळी ताकद खापर जिल्हा परिषद गटात लावली, म्हणून के सी पाडवी यांची बहीण विजयी झाली. खापर जिल्हा परिषद गटात भाजपा जिल्हाध्यक्षांचा गीता पाडवींनी केला पराभव. खापर जिल्हा परिषदेत काँग्रेसचा झेंडा. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवींची बहिण गीता पाडवी विजयी.

संबंधित बातम्या  

Nandurbar ZP result : बहीण जिंकली, खासदार हीना गावितांचा आनंद गगनात मावेना, गावितांच्या घरात किती पदं?

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें