Nandurbar election result 2021 : बहीण जिंकली, खासदार हीना गावितांचा आनंद गगनात मावेना, गावितांच्या घरात किती पदं?

या विजयानंतर खासदार हीना गावित म्हणाल्या, "माझी जबाबदारी आणखी वाढली, माझी लहान बहीण जिंकली, मतदारसंघाचा विकास करताना या भागाचा विकास जबाबदारी आहे. सगळ्यांच्या मतदारसंघातील विकास मला जोमाने करावा लागणार आहे, मागच्या निवडणुकीत ११ पैकी ७ जिंकून आले होते, यावेळी तो आकडा क्रॉस करु" असा विश्वास हीना गावित यांनी व्यक्त केला.

Nandurbar election result 2021 : बहीण जिंकली, खासदार हीना गावितांचा आनंद गगनात मावेना, गावितांच्या घरात किती पदं?
Heena Gavit_Supriya Gavit
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 12:14 PM

नंदुरबार : “मी विकासाची कामं घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. जनतेने मला आशिर्वाद दिले. जनतेचे मी आभारी आहे. मला पहिल्यापासूनच विश्वास होता, मी विजयी होणार, जनता मलाच आशिर्वाद देणार”, असं भाजपच्या विजयी उमेदवार सुप्रिया गावित म्हणाल्या. सुप्रिया गावित यांनी कोळदा जिल्हा परिषद गटात विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेच्या उमदेवाराचा पराभव केला. त्यानंतर टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी विजयी होण्याचा विश्वास होता असं सांगितलं.

सुप्रिया गावित या भाजप नेते आणि माजी मंत्री विजयकुमार गावित यांची मुलगी तर भाजप खासदार हीना गावित यांची लहान बहीण आहे.

या विजयानंतर खासदार हीना गावित म्हणाल्या, “माझी जबाबदारी आणखी वाढली, माझी लहान बहीण जिंकली, मतदारसंघाचा विकास करताना या भागाचा विकास जबाबदारी आहे. सगळ्यांच्या मतदारसंघातील विकास मला जोमाने करावा लागणार आहे, मागच्या निवडणुकीत ११ पैकी ७ जिंकून आले होते, यावेळी तो आकडा क्रॉस करु” असा विश्वास हीना गावित यांनी व्यक्त केला.

तर माजी मंत्री विजयकुमार गावित म्हणाले, “या जिल्ह्यात आम्ही विकास करतोय, त्यामुळे जनतेचा विश्वास आहे. जिल्हा परिषदेत सर्व ५ आणि पंचायत समितीतही ५ उमेदवार निवडून येतील”

गावितांच्या घरात किती पदं? 

  • माजी मंत्री विजयकुमार गावित हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले आहेत. ते सध्या आमदार आहेत
  • त्यांची मुलगी हीना गावित या भाजपच्या विद्यमान खासदार आहेत
  • आता सुप्रिया गावित या जिल्हा परिषद सदस्य
  • विजय कुमार गावित यांचे बंधू शरद गावित हे माजी आमदार आहेत
  • विजय कुमार गावित यांची पत्नी कुमुदिनी गावित या जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य माजी अध्यक्ष आहेत
  • शरद गावित यांचा मुलगा प्रकाश गावित हे जिल्हा परिषदेचे विद्यमान उमेदवार आहेत. त्यांचा निकाल हाती येणं बाकी आहे

महत्त्वाच्या लढतीत कुठे कोण कोण जिंकलं?

  • नंदुरबार माजी मंत्री विजयकुमार गावितांची मुलगी सुप्रिया गावित 1326 मतांनी विजयी
  • नंदुरबार : खापर जिल्हा परिषद गटातून के.सी पाडवी यांची बहिण गीता कागडा विजयी
  • धुळ्यात गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या लेकीचा दिमाखात विजय

भाजपा खासदार हिना गावितांची आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवींवर टीका, सगळे मतदारसंघ सगळी ताकद खापर जिल्हा परिषद गटात लावली, म्हणून के सी पाडवी यांची बहीण विजयी झाली. खापर जिल्हा परिषद गटात भाजपा जिल्हाध्यक्षांचा गीता पाडवींनी केला पराभव. खापर जिल्हा परिषदेत काँग्रेसचा झेंडा. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदिवासी विकास मंत्री के.सी पाडवींची बहिण गीता पाडवी विजयी

धुळ्यात भाजपची आघाडी

राज्यात जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासा भाजपला केवळ 2 जागांची गरज आहे. गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची कन्या जिल्हा परिषद निवडणुकीत धरती देवरे या लामकने गटातून विजयी झाल्या आहेत. धरती देवरे लामकने गटातून भाजप कडून निवडणूक लढवत होते. धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या आहेत. गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या.

VIDEO :

संबंधित बातम्या  

Maharashtra ZP and Panchayat Samiti Election Results 2021 LIVE: जिल्हा परिषद-पंचायत समितीचा निकाल, गुलाल कुणाचा?, राज्याचं लक्ष!

Dhule ZP Election Result : धुळ्यात चंद्रकांत पाटलांच्या लेकीचा दिमाखात विजय, भाजपला अवघ्या एका जागेची गरज

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.