दिवाळी धमाका ऑफर, दारुच्या बाटलीवर थंडगार बिस्लेरी मोफत, ठाण्यातील दुकानदाराची शक्कल

| Updated on: Nov 02, 2021 | 1:04 PM

शहापुरातही एका दुकानदाराने एक भन्नाट शक्कल लढवली आहे. तालुक्यातील एका बिअर बार मलकाने एक कॅटर दारुच्या बाटलीवर एक थंडगार बिस्लेरी पाण्याची बॉटल मोफत देण्याची ऑफर दिली आहे. तसा दिवाळी ऑफरचा चक्क बॅनरच त्याने लावला आहे.

दिवाळी धमाका ऑफर, दारुच्या बाटलीवर थंडगार बिस्लेरी मोफत, ठाण्यातील दुकानदाराची शक्कल
Thane liquor shop shopkeeper offer
Follow us on

ठाणे : दिवाळीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या आपली जाहीर करतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक युक्त्या आखतात. वेगवेगळी विलोभणं देत असतात. कुठे सेल, तर कुठे एकावर एक फ्रीची ऑफर असते. तर कुठे जुनं देऊन नवीन घेऊन अशीही डील असते.

शहापुरातही एका दुकानदाराने एक भन्नाट शक्कल लढवली आहे. तालुक्यातील एका बिअर बार मलकाने एक कॅटर दारुच्या बाटलीवर एक थंडगार बिस्लेरी पाण्याची बॉटल मोफत देण्याची ऑफर दिली आहे. तसा दिवाळी ऑफरचा चक्क बॅनरच त्याने लावला आहे. यामुळे काही तरी वेगळा करुन दाखवल्याने सध्या याची चर्चा रंगली आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शहापुरातील हॉटेल राजेंद्र बार या बारच्या मालकाने दिवाळी स्पेशल ऑफर म्हणून दारुच्या बाटलीवर एक थंडगार बिस्लेरी पाण्याची बॉटल फ्री देण्याचं ठरवलं आहे. आता या बार मालकाची ही ऑफर किती यशस्वी ठरते हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT

Jio आणि Google ने आज जाहीर केले की बहुप्रतिक्षित JioPhone Next हा स्मार्टफोन खास दोन्ही कंपन्यांनी भारतासाठी डिझाइन केलेला आहे. JioPhone Next दिवाळीच्या दिवशी सादर केला जाणार आहे आणि तो एक अतिशय स्वस्त स्मार्टफोन असल्याचे सिद्ध होईल. JioPhone Next ची एंट्री प्राईस फक्त 1,999 रुपये असेल आणि शिल्लक रक्कम 18/24 महिन्यांत सहज EMIs द्वारे भरता येईल.

जिओफोन नेक्स्टचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, हा फोन त्या लोकांसाठी तयार केला जात आहे, जे जास्त किंमतीमुळे टचस्क्रीन स्मार्टफोन खरेदी करण्यास तयार नाहीत. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमचं लाईट व्हर्जन वापरलं जाईल, जे अँड्रॉइड गो असू शकते. अँड्रॉइड गो प्रोग्राम विशेषतः त्या लोकांसाठी तयार करण्यात आला आहे, जे एंट्री लेव्हल आणि लो कॉन्फिगरेशन स्मार्टफोन खरेदी करतात.

संबंधित बातम्या :