MNS vs BJP : राज ठाकरे यांच्या विश्वासू शिलेदाराने डोंबिवलीत भाजप प्रदेशाध्यक्षांना दिला मोठा धक्का
MNS vs BJP : डोंबिवलीत राज ठाकरे यांच्या विश्वासू शिलेदाराने भाजप प्रदेशाध्यक्षांना मोठा धक्का दिला आहे. या खेळीची राज्याच्या राजकीय वर्तुळात नक्कीच चर्चा होईल.

डोंबिवलीत मनसेने भाजपला मोठा धक्का दिला. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या घराशेजारीच रविवारी शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या काळात मनसेतून भाजपमध्ये गेलेल्या कार्यकर्त्यांनी घरवापसी केली.सोबत भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनाही मनसेत आणलं. “दोन गेले, चार घेऊन आले” रवींद्र चव्हाण यांच्या प्रभागातील महिलांचा राजू पाटील यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. चव्हाणांच्या घराशेजारीच पक्षप्रवेश; “घाबरण्याची गरज नाही” म्हणत राजू पाटील यांचा भाजपला टोला. दरम्यान फटाक्यांच्या आतषबाजीनंतर राजू पाटील यांनी “हे फटाके रवींद्र चव्हाण यांनी वाजवले का?” अशी मिश्किल टिप्पणी केली. भाजपमधून आलेल्या महिलांना कॅम्प लावायची सवय आहे. त्यांना मान-सन्मान आणि जबाबदाऱ्या देणार अशी राजू पाटील यांनी ग्वाही दिली. “आज फक्त झलक आहे, कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास गप्प बसणार नाही” असा मनसे शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी भाजपला थेट इशारा दिला.
(बातमी अपडेट होत आहे)
