Afan Kutty : डोळ्याला पट्टी बांधून काही क्षणातच महापौरांचं चित्रं साकारलं; मुंब्र्यातील 16 वर्षीय तरुणांच्या करामतीने सर्वच अवाक्

आजवर त्यांनी अनेक ठिकाणी रुबिक्सच्या माध्यमातून नावे तयार केली आहेत. तसेच जवळच्या व्यक्तींची, नातेवाईकांची चित्रेही साकारली आहे. आज ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांचे चित्र त्यांनी अवघ्या आठ मिनिटांत तर ठाणे महापालिकेचे बोधचिन्ह सात मिनिटांत रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून साकारले.

Afan Kutty : डोळ्याला पट्टी बांधून काही क्षणातच महापौरांचं चित्रं साकारलं; मुंब्र्यातील 16 वर्षीय तरुणांच्या करामतीने सर्वच अवाक्
डोळ्याला पट्टी बांधून काही क्षणातच महापौरांचं चित्रं साकारलं
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 7:55 PM

ठाणे : डोळ्याला पट्टी बांधून ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांचे चित्र, ठाणे महानगरपालिकेचे बोधचिन्ह आज महापौर दालनात एका 16 वर्षीय मुलाने काही क्षणात साकारले. हे सारं पाहून महापौरसुद्धा भारावले. रुबिक्स क्यूब (Rubiks Cube)च्या माध्यमातून चित्र साकारणाऱ्या या अवलियाचे नाव आहे अफान कुट्टी. त्याच्या या कलेला दाद देत महापौरांनी त्याचे कौतुक करुन त्याचा गौरव केला. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक बाबाजी पाटील उपस्थित होते. अफान कुट्टी हा 16 वर्षीय तरूण मुंब्र्यातील काळसेकर महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तीन वर्षापासून अफान स्वत:च ही कला शिकत असल्याचे सांगतो. (In Thane, the boy drew a picture of the mayor through a Rubik’s Cube)

मोबाईलचे वेड घालवण्यासाठी वडिलांनी कलेची आवड लावली

आजवर त्यांनी अनेक ठिकाणी रुबिक्सच्या माध्यमातून नावे तयार केली आहेत. तसेच जवळच्या व्यक्तींची, नातेवाईकांची चित्रेही साकारली आहे. आज ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांचे चित्र त्यांनी अवघ्या आठ मिनिटांत तर ठाणे महापालिकेचे बोधचिन्ह सात मिनिटांत रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून साकारले. अफान कुट्टी मोबाईलचे प्रचंड वेड लागले होते. त्याला मोबाईलपासून वेगळे करण्यासाठी वडिलांनी त्याला रुबिक्स आणून दिले आणि ते जोडून त्यापासून सुरूवातीला व्यक्तींची नावे तयार करणे, नंतर हळूहळू घरातल्यांची चित्र तयार करू लागला. काही दिवसांतच तो रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून नावे व चित्र काही मिनिटात तयार करु लागला आणि आता त्यात तो पारंगत झाला असल्याचे अफान कुट्टी याने सांगितले.

अफानच्या कलेची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

या कलेची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच मल्टिपल एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. अफान कुट्टी याच्या कलेबद्दल त्याचा सन्मान महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक बाबाजी पाटील यांनी केला. तसेच त्याला भविष्यात पुढे जाण्यासाठी मदतीचा हात देणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले. (In Thane, the boy drew a picture of the mayor through a Rubik’s Cube)

इतर बातम्या

Ambernath Shiv Temple : अंबरनाथचं शिवमंदिर महाशिवरात्रीला बंद, गर्दी टाळण्यासाठी मंदिराच्या पुजाऱ्यांचा निर्णय

ज्या भाजपच्या आमदाराकडून आदित्य ठाकरेंवर टीका, त्यांच्याच हस्ते शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला हारतुरे; कल्याणमध्ये चाललंय काय?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.