ज्या भाजपच्या आमदाराकडून आदित्य ठाकरेंवर टीका, त्यांच्याच हस्ते शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला हारतुरे; कल्याणमध्ये चाललंय काय?

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या डोक्यावर मानसिक परिणाम झालाय, अशी खोचक टीका भाजपा आमदार रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली होती.

ज्या भाजपच्या आमदाराकडून आदित्य ठाकरेंवर टीका, त्यांच्याच हस्ते शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला हारतुरे; कल्याणमध्ये चाललंय काय?
भाजपच्या आमदाराकडून आदित्य ठाकरेंवर टीका, त्यांच्याच हस्ते शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला हारतुरे; कल्याणमध्ये चाललंय काय?
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 3:22 PM

कल्याण: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या डोक्यावर मानसिक परिणाम झालाय, अशी खोचक टीका भाजपा आमदार रवींद्र चव्हाण (ravindra chavan) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली होती. त्याला शिवसेनेनेही (shivsena) सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. चव्हाणांच्या टीकेवरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण तापलेलं असतानाच शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने थेट चव्हाण यांच्या हातून हारतुरे घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा माजी नगरसेवक भाजपमध्ये जाणार आहे का? असा सवालही केला जात आहे. तर, या फोटोवर शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. चव्हाण यांनीही या माजी नगरसेवकाच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत नेमकं चाललंय काय? असा सवालही केला जात आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक तोंडावर आहे. तसेच प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी एकाप्रकारे प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेना-भाजपने विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजनचा धडाका लावलाय. काही दिवसापूर्वी विकासकामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमासाठी राज्याचे परिवहन मंत्री आदित्य ठाकरे कल्याण-डोंबिवलीत आले होते, भाषणा दरम्यान आदित्य ठाकरे यांनी 2024 नंतर आम्ही केंद्रातून निधी आणू म्हणजे 2024 नंतर आपली सत्ता येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. आदित्य ठाकरे यांच्या या विधानानंतर डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. आदित्य ठाकरे स्वप्न पाहत आहे किंवा त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली होती.

दाल में कुछ काला है

भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या टीकेनंतर शिवसेनेकडून सुद्धा टीका करण्यात आली होती. शिवसेनेचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी रवींद्र चव्हाण यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. भाजपच्या आठ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आणि आमची विकास कामे पाहून चव्हाण यांचे मानसिक संतुलन बिघडले आहेस असा पलटवार दीपेश म्हात्रे यांनी केला होता. शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आज डोंबिवलीत एका कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमा दरम्यान भाजप आमदार रवींद्र चव्हाण डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात उपस्थित होते.

शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या प्रभागात हे काम होणार आहे. मात्र या कामाचा निधी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिला होता. त्यामुळे विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी हे दोन्ही नेते एकत्र आले होते. यावेळी चव्हाण यांनी म्हात्रे यांचा गुच्छ देऊन स्वागतही केलं. चव्हाणांनी आदित्य यांच्यावर टीका केल्यानंतरही शिवसेनेचा माजी नगरसेवक चव्हाण यांच्या कार्यक्रमात हजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हे दोन्ही नेते एकत्र आल्याने दाल में कुछ काला है या म्हणीचा प्रत्यय स्थानिकांना येत आहे. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आता शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येत आहे याकडेसर्वांचे लक्ष लागले आहे

गुच्छ हातात घेतला, धनुष्यबाण टाकला नाही

मला सातत्याने फोन येत होता. हे काम माझ्या प्रभागातील आहे, म्हणून मी गेलो. गुच्छ हातात घेतला म्हणून मी धनुष्यबाण टाकला नाही. निवडणुकीच्यावेळी ताणलेला धनुष्यबाण माझ्या हाती राहणार आहे. आमदार आमच्या नेत्यावर टीका करतात हे आम्हाला पण चांगले वाटत नाही. परंतु आम्ही पण त्यांना योग्यवेळी त्यांच्याच भाषेत प्रतिउत्तर देऊ. मी कार्यक्रमाला गेलो म्हणजे भाजपाला मदत करणार नाही. रमेश म्हात्रे शिवसेनेच्या माणूस आहे. पक्षाने दगड दिला तरी तो सुद्धा निवडून आणणार, अशी प्रतिक्रिया रमेश म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. तर, चव्हाण यांच्याशी संपर्क होऊ शकल नाही.

संबंधित बातम्या:

मनसे सोडून जाणाऱ्यांना बघून घेऊ, आमदार राजू पाटील यांचा गयारामांना सज्जड दम

Thakurli Bridge : डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा ठाकुर्ली उड्डाणपूल वाहतुकीसाठी दोन दिवस बंद

फडणवीसांसारख्या प्रगल्भ माणसाकडून ही अपेक्षा नाही; श्रेयवादाच्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.