मुंबईत रुग्णवाढीचा दर घटला, पण केडीएमसीत नाही, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय, आयुक्तांचा मास्टर प्लान

मुंबईत एकीकडे नव्या कोरोनाबाधित रुग्णवाढीत घट होत आहे. मात्र मुंबईनजीक (Mumbai) असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) क्षेत्रात कोरोना रुग्णांचा आकडा दररोज मोठ्या प्रमाणात वाढतो (KDMC will develop two new oxygen plant in Kalyan Dombivli)

मुंबईत रुग्णवाढीचा दर घटला, पण केडीएमसीत नाही, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय, आयुक्तांचा मास्टर प्लान
केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 6:34 PM

कल्याण (ठाणे) : मुंबईत एकीकडे नव्या कोरोनाबाधित रुग्णवाढीत घट होत आहे. मात्र मुंबईनजीक (Mumbai) असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका (KDMC) क्षेत्रात कोरोना रुग्णांचा आकडा दररोज मोठ्या प्रमाणात वाढतोय. पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे कठीण होतंय. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. महापालिका हवेतून ऑक्सिजन वेगळा करण्याचे 2 प्लांट उभारणार आहे. महापालिकेने यासाठीची निविदा नुकतीच काढली आहे. हे दोन्ही प्लांट मे महिन्यात कार्यान्वित होतील, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे (KDMC will develop two new oxygen plant in Kalyan Dombivli).

महापालिकेकडून दोन ऑक्सिजन प्लांट टाकण्यासाठी निविदा

कल्याण-डोंबिवलीत महापालिकेची 7 आणि 87 खाजगी कोविड रुग्णालये आहेत. या रुग्णालयांना 50 मेट्रीक टन ऑक्सिजन मिळतो. हा ऑक्सिजन पुरेसा नाही. ऑक्सिजन मिळत नसल्याने ऑक्सिजन बेड तयार होऊ शकत नाही. त्यामुळे महापालिकेने दोन ऑक्सिजन प्लांट टाकण्यासाठी निविदा काढली आहे. या प्लांटची क्षमता दिवसाला 200 जंबो सिलिंडर ऑक्सिजन तयार करण्याची आहे. एक प्लांट रुक्मीणी प्लाझा तर दुसरा शक्तीधाम येथील कोविड सेंटर येथे उभारला जाणार आहे (KDMC will develop two new oxygen plant in Kalyan Dombivli).

ऑक्सिजन प्लांटसाठी तीन कोटी खर्च

हवेतील ऑक्सिजन वेगळा करण्याचे हे प्लांट आहेत. एका प्लांटचा खर्च किमान दीड कोटी रुपये इतका आहे. दोन्ही प्लांटवर एकूण तीन कोटी रुपये खर्च होणार आहे. तूर्तास महापालिकेच्या निधीतून हे ऑक्सिजन प्लांट उभारले जाणार असले तरी त्याला राज्य सरकारकडून निधी प्राप्त होणार आहे. या प्लांटपैकी एक प्लांट हा 10 मे पर्यंत कार्यान्वीत केला जाऊ शकतो. तर दुसरा मे अखेरपर्यंत कार्यान्वीत केला जाणार असल्याची हमी कंत्रटदाराकडून देण्यात आली आहे.

खासगी रुग्णालयेही प्लांट उभारणार

खाजगी कोविड रुग्णालयांशी आज महापालिका आयुक्तांनी वेबीनॉरद्वारे संवाद साधला. खाजगी रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयातील बेड क्षमतेनुसार ऑक्सिजन प्लांट सुरु करावा. एका प्लांटसाठी किमान 35 ते 40 लाख रुपये खर्च होता. हा खर्च खाजगी रुग्णालयांकरीता फार मोठा नाही. त्यांनी प्लांट सुरु केल्यावर तो केवळ कोविड रुग्णालयांसाठीच नव्हे तर कायम स्वरुपी उपयुक्त ठरणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. काही खाजगी रुग्णालयांनी प्लांट सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे.

ऑक्सिजनच्या ऑडीटसाठी भरारी पथके नियुक्त

ऑक्सिजनचा तुटवडा पाहता महापालिका आयुक्तांनी सर्व कोविड रुग्णालयांना ऑक्सिनजचे ऑडीट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी महापालिकेने भरारी पथक नियुक्त केले आहे. हे पथक प्रत्येक कोविड रुग्णालयात जाऊन ऑक्सिजन ऑडीट करणार आहे. एखाद्याला रुग्णालयात ऑक्सिजन पुरेसा मिळतो की नाही, पुरवठा दाराकडून काय अडचणी येत आहे, रुग्णालयातील ऑक्सीजन यंत्रणोत लिकेज आहे का? याची तपासणी पथक करणार आहे. त्याचबरोबर एखाद्या रुग्णावर योग्य उपचार सुरु आहे की नाही. रेमडेसीवीर इंजेक्शन नको असता सांगितले जात आहे का, याबाबीही भरारी पथकाकडून तपासल्या जाणार आहेत, असे आयुक्तांनी सांगितले.

कोविड रुग्णांचे रजिस्ट्रेशन दोनच रुग्णालयात होणार

कल्याण डोंबिवली महापालिकेने कोविड रुग्णांवर उपचारासाठी सात ठिकाणी जंबो कोविड रुग्णालये उभारली आहे. केवळ रुक्मीणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयातच कोविड रुग्णांचे रजिस्ट्रेशन केले जाईल. त्यानंतर त्याला महापालिकेच्या कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाईल, असे आदेश महापालिका डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहे.

हेही वाचा : गडकरीसाहेब म्हणाले, विदर्भातील ऑक्सिजनचं आम्ही बघतो, बाकीचं तुम्ही बघा : अजित पवार

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.