पाणी द्या नाही तर…, महिलांनी केलेली मागणी ऐकून प्रशासन हादरले

| Updated on: May 21, 2023 | 3:43 PM

पाण्याच्या शोधात निघणाऱ्या गावातील महिला आक्रमक झाल्यात. नियमित पाणी बिल भरूनदेखील पाणी मिळत नाही. आज हंडा कळशी घेऊन गावातील मोठ्या घरासमोर प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

पाणी द्या नाही तर..., महिलांनी केलेली मागणी ऐकून प्रशासन हादरले
Follow us on

प्रतिनिधी, कल्याण : कल्याण ग्रामीण भागातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खोणी ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. मात्र ग्रामपंचायत मधील अंतर्गत राजकीय वादांमुळे सामान्य नागरिकांना पाण्यासाठी सध्या भटकंती करावी लागत आहे. गावात जलवाहिन्या टाकून त्यात पाणी नाही. त्यामुळे उन्हातान्हात पाण्याच्या शोधात निघणाऱ्या गावातील महिला आक्रमक झाल्यात. नियमित पाणी बिल भरूनदेखील पाणी मिळत नाही. आज हंडा कळशी घेऊन गावातील मोठ्या घरासमोर प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

सरपंचाकडे लेखी तक्रार

दुसरीकडे गावातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावकऱ्यांचे हाल पाहावत नाही. गावकऱ्यांचा होणारा संताप पाहता ग्रामपंचायत सदस्यांनी खोणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे लेखी पत्र लिहले. पाणी देऊ शकत नाही तर विष प्राशन करण्याची परवानगी मागितली आहे.

हे सुद्धा वाचा

पत्र सोशल मीडियावर व्हायरल

सदस्यांचे हे पत्र सदस्य सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन याकडे कधी लक्ष देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावर सध्या ग्रामपंचायत प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन सोमवारी काय भूमिका मांडते हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.

हंडा कळशीला घेऊन निषेध

गावात पाणी मिळत नसल्याने खोणीच्या ग्रामपंचायत सदस्या जयश्री महेश ठोंबरे आणि मुंकुंद ठोंबरे आक्रमक झालेत. मतदान करून मतदारांनी निवडून दिले. मात्र राजकीय वादामुळे मतदारांना पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी हंडा कळशी घेऊन गावात निषेध केला.

संतापलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी खोणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे लेखी पत्र लिहले. या पत्रात त्यांनी विष प्राशन करण्याची परवानगी मागितली आहे. याविषयी संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. बाहेर असल्याचे कारण सांगत गावकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देणे टाळले.