मनसेचे एकमेव आमदार तळीये गावात, 11 लाखांची मदत, राजू पाटलांमधील संवेदनशील माणसाचं दर्शन

| Updated on: Aug 03, 2021 | 11:04 PM

मनसे आमदार राजू पाटील यांनी मंगळवारी (3 ऑगस्ट) पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

मनसेचे एकमेव आमदार तळीये गावात, 11 लाखांची मदत, राजू पाटलांमधील संवेदनशील माणसाचं दर्शन
मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून पूरग्रस्तांना मदत
Follow us on

डोंबिवली (ठाणे) : मनसे आमदार राजू पाटील यांनी मंगळवारी (3 ऑगस्ट) पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांनी तळीये गावासाठी 11 लाखांची मदत जाहीर केली आहे. मूसळधार पावसामुळे महाड, खेड, चिपळूण आणि आजूबाजूच्या परिसरात पूर आला होता. यात अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले. पूरग्रस्तांच्या सेवेला सामाजिक संस्था आणि मनसे कार्यकर्ते धावून गेले आहेत. पूरग्रस्तांना डोंबिवली मनसे तर्फे सुद्धा अन्नधान्य, कपडे तसेच गृहउपयोगी वस्तू देण्यात येत आहे.

मनसे शक्य तितकी मदत करेल, राजू पाटलांचं आश्वासन

मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर आणि त्यांचे कार्यकर्ते मदतीसाठी मेहनत घेत आहेत. मनसे आमदार राजू पाटील यांनी मंगळवारी (3 ऑगस्ट) महाड, तळीये, खेड येथे पाहणी केली आणि नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी आमदार पाटील, सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी जेवढी मदत करता येईल तेवढी मदत मनसे पक्षाकडून केली जाईल असे आश्वासन दिले.

तळीये गावासाठी 11 लाखांची मदत

दुसरीकडे महाड तालुक्यातील तळीये गावात जाऊन सुद्धा मनसे आमदार पाटील यांनी पाहणी केली. तळीये हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळून दुर्दैवी घटना घडली. सदर घटनेची सर्वच स्थरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आता याच गावाला आमदार राजू दादा पाटील यांच्याकडून 11 लाखांचा धनादेश देण्यात आला आहे.

मनसे आमदार यांनी खेड गावातील बाजारपेठची सुद्धा पाहणी केली. यावेळी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, सरचिटणीस मनोज चव्हाण, जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर, जिल्हा संघटक हर्षद पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत, संदीप म्हात्रे , योगेश पाटील आणि महाड/खेड/डोंबिवलीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

रस्ते आणि नाल्याचं निकृष्ट दर्जाचं काम, आमदार संतापले, आमदारांसमोर अधिकारी एकमेकांवर भडकले

मुंबईपाठोपाठ ठाण्यातील व्यापारी वर्गालाही दिलासा, मॉल्स आणि सिनेमागृह मात्र बंदच राहणार, जाणून घ्या संपूर्ण नियमावली