AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: धक्कादायक! मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यावर फेरीवाल्यांचा हल्ला; पोलिसांनाही घातला घेराव

भाईंदर पूर्वमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या फेरीवाला पथकातील अधिकाऱ्यावर हल्ला झाला आहे. भाईंदर पूर्वच्या बी.पी. रोड परिसरात ही घटना घडली.

Video: धक्कादायक! मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यावर फेरीवाल्यांचा हल्ला; पोलिसांनाही घातला घेराव
| Edited By: sagar joshi | Updated on: Nov 17, 2021 | 7:30 AM
Share

मीरा भाईंदर: भाईंदर पूर्वमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या फेरीवाला पथकातील अधिकाऱ्यावर हल्ला झाला आहे. भाईंदर पूर्वच्या बी.पी. रोड परिसरात ही घटना घडली. हल्लेखोर फेरीवाल्यांना महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणी पाच जणांवर नवघर पोलीस ठाण्यात कलम 353 अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान हल्ला 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भाईंदर पूर्वेच्या बी.पी. रोड परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई सुरू होती. या दरम्यान फेलीवाल्यांकडून फेरीवाला पथकातील अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. फेरीवाला पथकातील अधिकारी प्रशांत पाटील यांना फेरीवाल्यांनी घेराव घालत धक्काबुक्की केल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास शंभरपेक्षा अधिक फेरीवाल्यांनी कारवाईसाठी गेलेल्या पालिक कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी  महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत फेरीवाल्यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

गुन्हा दाखल 

या प्रकरणी महापालिका अधिकारी प्रशांत पाटील यांच्या तक्रारीवरून पाच जणांवर नवघर पोलीस ठाण्यात कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अतिरिक्त आयुक्तांवरही झाला होता हल्ला 

दरम्यान मुंबई आणि परिसरामध्ये फेरीवाल्यांकडून अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटना वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. काही दिवसांपूर्वी, ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर देखील फेरिवाल्याने हल्ला केला होता. या घटनेत त्यांना आपल्या हाताची दोन बोट गमवावी लागली होती. तसेच या हल्ल्यात त्यांचा आंगरक्षक देखील गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Skoda ची शानदार Sedan या आठवड्यात बाजारात, लाँचिंगपूर्वी जाणून घ्या कारबद्दल 5 खास गोष्टी

Health Care : या हेल्दी स्नॅक्सचा आहारात समावेश करा, वाढलेले वजन कमी होईल!

Follow Us
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...