Skoda ची शानदार Sedan या आठवड्यात बाजारात, लाँचिंगपूर्वी जाणून घ्या कारबद्दल 5 खास गोष्टी

स्कोडा स्लाव्हिया ही तिच्या सेगमेंटमधील दुसरी सर्वात लांब आणि रुंद कार आहे. या कारची लांबी 4541 मिमी, रुंदी 1752 मिमी आणि उंची 1487 मिमी इतकी आहे. याशिवाय, कारला चांगला ग्राउंड क्लिअरन्स मिळण्याची अपेक्षा आहे.

Skoda ची शानदार Sedan या आठवड्यात बाजारात, लाँचिंगपूर्वी जाणून घ्या कारबद्दल 5 खास गोष्टी
Skoda Slavia
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 6:30 AM

मुंबई : Skoda Auto India कंपनी18 नोव्हेंबर 2021 स्लाव्हिया सेडान (Skoda Slavia Sedan) लाँच करणार आहे. 90% पेक्षा जास्त लोकल कंटेंटसह MQB A0 IN प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आलेले हे कंपनीचे तिसरे मॉडेल असेल. स्लाव्हियाला रॅपिडच्या तुलनेत थोडासा प्रीमियम दिला आहे कारण त्यात हल्लीच्या तुलनेत अपमार्केट फीचर्स आहेत. (Skoda Slavia Sedan to launch on 18 November, know 5 special things about ne car before its launch)

Skoda Slavia चे फीचर्स

Skoda च्या आगामी कारमध्ये Apple CarPlay आणि Android Auto कंपॅटिबिलिटी, वायरलेस चार्जिंग पॅड, 6 एअरबॅग्ज, पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंटेशन, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, पॉवर सीट्स, माउंटेड कंट्रोल्ससह मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, आणि मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाईल, असा दावा करण्यात आला आहे.

Skoda Slavia चं इंटीरियर

स्कोडा स्लाव्हिया ही तिच्या सेगमेंटमधील दुसरी सर्वात लांब आणि रुंद कार आहे. या कारची लांबी 4541 मिमी, रुंदी 1752 मिमी आणि उंची 1487 मिमी इतकी आहे. याशिवाय, कारला चांगला ग्राउंड क्लिअरन्स मिळण्याची अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, युजर्सना अधिक चांगली लेग रूम मिळेल, जी 2651 मिमीची आहे, ज्याअंतर्गत व्हीलबेस देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Skoda Slavia का डिजाइन

या स्कोडा कारचे डिझाईन चेक ब्रँडच्या नवीन डिझाईनच्या धर्तीवर तयार करण्यात आलं आहे, ज्याची माहिती कंपनीच्या शेअर इन्वाइटद्वारे देण्यात आली आहे. कारची रचना MQB A0-IN प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. या कारचा लूक थोडासा स्कोडाच्या नेक्स्ट जनरेशन कार ऑक्टाव्हियासारखा दिसतो.

Skoda Slavia चे सेफ्टी फीचर्स

सुरक्षिततेच्या दृष्टीने यात सहा एअरबॅग्ज, EBD आणि ABS, TCS, स्पेशल ब्रेकिंग सिस्टीम आणि, हिल स्टार्ट असिस्ट, हिल होल्ड कंट्रोल, अँटी स्लिप रेग्युलेशन आणि मोटर स्लिप रेग्युलेशन, ब्रेक डिस्क वायपिंग, रोल ओव्हर यांसारखे फीचर्स दिले जातील.

दमदार इंजिन

Skoda Slavia मध्ये दोन प्रकारचे इंजिन पर्याय दिले जाऊ शकतात. ही कार 1.0 लीटर TSI पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असेल जे मॅक्सिमम 114 एचपी पॉवर आणि 178 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाईल. दुसरे इंजिन 1.5 लीटर TSI पेट्रोल इंजिन असेल, जे 148 hp पॉवर आणि 250 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. तसेच, यात 6 स्पीड मॅन्युअल आणि 7 स्पीड डीएसपी ट्रान्समिशन मिळेल.

इतर बातम्या

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

2022 Hyundai Creta फेसलिफ्टचा ग्लोबल डेब्यू, जाणून घ्या भारतात कधी लाँच होणार?

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

(Skoda Slavia Sedan to launch on 18 November, know 5 special things about ne car before its launch)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.