Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर

Yezdi adventure मोटरसायकल लवकरच भारतीय दुचाकी बाजारात दाखल होणार आहे. या मोटरसायकलचा फोटो नुकताच लीक झाला आहे, ज्यामध्ये बाईकच्या डिझाइनसह काही वैशिष्ट्यांविषयी माहिती उपलब्ध आहे.

Yezdi Adventure मोटारसायकल लवकरच भारतात लाँच होणार, रॉयल एनफील्डला टक्कर
Yezdi
Follow us
| Updated on: Nov 12, 2021 | 7:26 AM

मुंबई : Yezdi adventure मोटरसायकल लवकरच भारतीय दुचाकी बाजारात दाखल होणार आहे. या मोटरसायकलचा फोटो नुकताच लीक झाला आहे, ज्यामध्ये बाईकच्या डिझाइनसह काही वैशिष्ट्यांविषयी माहिती उपलब्ध आहे. दुसरीकडे, क्लासिक लिजेंड्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा यांनी ट्विट केले आहे की, आता दुसऱ्या भावाला परत आणण्याची वेळ आली आहे. @jawamotorcycles काय म्हणता?. (Yezdi Roadking Adventure Motorcycle Spied Undisguised, bike will Launch Soon)

थरेजा यांनी त्यांच्या ट्विटच्या शेवटी ‘#Y’ वापरला आहे, जो भारतात Yezdi लाँच करण्याचे संकेत देतो. काही दिवसांपासून या बाईकच्या टेस्टिंगच्या बातम्याही येत आहेत. आता कंपनीच्या प्रमुखाने फोटो आणि माहिती दिल्यानंतर ही बाईक लवकरच लाँच होईल, असे वाटते. मात्र, लॉन्चिंग टाइमलाइनबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

ट्रेडमार्क आणि वेबसाइटसाठी नोंदणी

कंपनीने Yezdi Roadking साठी ट्रेडमार्क देखील नोंदवला आहे. यासोबतच YezdiRoadking.com ही वेबसाइटही नोंदणीकृत करण्यात आली आहे, जी बाईक आणि किमतीशी संबंधित माहिती देईल. सध्या yezdi.com नावाची वेबसाइट असली तरी. यामध्ये या क्लासिक बाइकचे जुने फोटो आणि स्केचेस आहेत. या साईटवर बाईकचा आतापर्यंतचा प्रवास आणि यश दाखवण्यात आले आहे.

Yezdi च्या दोन बाईक्स लाँच होण्याची शक्यता

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, भारतात लवकरच दोन Yezdi मोटरसायकल सादर केल्या जातील. यामध्ये रोडकिंग आणि एडीव्ही या गाड्यांचा समावेश असेल. दोन्ही मोटारसायकल एकाच प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या असतील असा विश्वास आहे. या बाईक नोव्हेंबर महिन्यात लॉन्च केल्या जातील, असा दावा एका वेबसाइटने केला असला तरी कंपनीने असा कोणताही दावा केलेला नाही. भारतीय बाजारपेठेत पेट्रोल व्यतिरिक्त आता इलेक्ट्रिक बाइक्स देखील तयार केल्या जात आहेत.

भारतात अॅडव्हेंचर स्टाईल बाईकला मोठी मागणी

अलीकडच्या काळात भारतीय बाजारात अॅडव्हेंचर स्टाईल बाईकची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासह, रेट्रो-स्टाईल देखील खूप लोकप्रिय होत आहे. हिरो मोटोकॉर्पपासून रॉयल एनफिल्ड पर्यंत, अनेक ब्रॅण्डने या सेगमेंटमध्ये आपले मॉडेल सादर केले आहेत. अशा परिस्थितीत Yezdi ची येणारी ही आगामी adventure मोटरसायकल तरुणांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरू शकते.

पॉवरफुल इंजिन

या बाईकच्या इंजिन आणि पॉवरट्रेनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु असे मानले जात आहे की, यामध्ये कंपनी 293cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरू शकते. जे जावाच्या बाईक्समध्येही पाहायला मिळते. हे इंजिन 27.33 PS पॉवर आणि 27.02 Nm टॉर्क जनरेट करते. या व्यतिरिक्त, दुसरा इंजिन पर्याय म्हणून 334cc इंजिन देखील दिले जाऊ शकते. ही दोन्ही इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्ससह येतात.

रॉयल एनफील्डला टक्कर!

बाजारात आल्यानंतर या दोन्ही बाईक्स प्रामुख्याने रॉयल एनफील्डशी स्पर्धा करतील. रोडकिंग असे नाव असलेल्या या स्क्रॅम्बलर मॉडेलची स्पर्धा रॉयल एनफील्डच्या आगामी मॉडेल Scram 411 आणि अॅडव्हेंचर मॉडेल रॉयल एनफील्ड हिमालयनशी होईल.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(Yezdi Roadking Adventure Motorcycle Spied Undisguised, bike will Launch Soon)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.