AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 Points Table: मोठा उलटफेर, इटलीने इंग्लंडला दिला धोबीपछाड

ICC Men’s T20 World Cup 2026 Match Points Table:: टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील क गटात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता दिसत आहे. इटलीने नेपाळचा 10 विकेट राखून पराभव केला आणि गुणतालिकेत त्याचा परिणाम दिसून आला.

T20 World Cup 2026 Points Table: मोठा उलटफेर, इटलीने इंग्लंडला दिला धोबीपछाड
T20 World Cup 2026 Points Table: मोठा उलटफेर, इटलीने इंग्लंडला दिला धोबीपछाडImage Credit source: PTI
| Updated on: Feb 12, 2026 | 7:02 PM
Share

T20 World Cup 2026 Points Table Updated:  टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत बरेच उलटफेर पाहायला मिळाले आहेत. तसं पाहिलं तर दुबळ्या संघाने पराभूत करण्याची घटना काही या स्पर्धेत घडलेली नाही. पण सध्याची स्थिती पाहता धाकधूक वाढली आहे. दुबळ्या संघांची कामगिरी मात्र चांगली राहिली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा सहाव्या दिवशी गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे.  क गटात काहीही होऊ शकतं अशी स्थिती आहे. नेपाळने इंग्लंडला पहिल्या सामन्यात विजयासाठी चांगलंच झुंजवलं. त्यामुळे इंग्लंडला 2 गुण मिळाले पण नेट रनरेट काही चांगला करता आला नाही. तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. त्यामुळे क गटात तिसऱ्या स्थानी घसरण झाली होती. आता इटली नेपाळ सामन्यामुळे चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.

इटलीने नेपाळला 10 विकेट आणि 44 चेंडू राखून विजय मिळवला आहे. त्याचा फायदा इटलीला झाला आहे. इटलीच्या पदरात 2 गुण पडले आहेत. इतकंच काय तर नेट रनरेटही जबरदस्त सुधारला आहे. याचा फटका इंग्लंडच्या संघाला बसला आहे. इंग्लंडची थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळे आता इंग्लंडला या स्पर्धेतील उर्वरित दोन सामने काहीही करून जिंकावेच लागतील. इंग्लंडचे उर्वरित सामने इटली आणि स्कॉटलँडविरूद्ध आहे. यापैकी एकही सामना गमावला तर इंग्लंडला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागू शकतो.  त्यामुळे इंग्लंडला उर्वरित दोन्ही सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवणं भाग आहे.

क गटात वेस्ट इंडिज, स्कॉटलँड, इटली, इंग्लंड आणि नेपाळ हे पाच संघ आहे. यापैकी या गटात टॉपला असलेल्या दोन संघांना सुपर 8 फेरीत जागा मिळणार आहे. त्यामुळे टॉप 2 मध्ये राहण्यासाठी चुरस वाढली आहे. वेस्ट इंडिजने आतापर्यंत 2 पैकी 2 सामने जिंकून 4 गुण आणि +1.625 नेट रनरेटसह पहिलं स्थान गाठलं आहे. स्कॉटलँडने 2 पैकी 1 सामन्यात विजय मिळवून 2 गुण आणि +0.950 नेट रनरेटसह दुसरं स्थान पटकावलं आहे.

इटलीचा संघ तिसऱ्या स्थानावर असून 2 पैकी एका सामन्यात विजय मिळवला आहे. 2 गुण आणि -0.352 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानी आहे. तर इंग्लंडचा संघ 2 पैकी 1 विजय मिळवत 2 गुण आणि -0.650 नेट रनरेटसह चौथ्या स्थानी आहे. तर नेपाळचा संघ दोन्ही सामन्यात पराभूत झाल्याने स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना