AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास

भारतीय ऑटो मार्केटमध्ये स्वस्त इलेक्ट्रिक कार आणण्याची शर्यत आणखी तीव्र होणार आहे. जिथे आधी भारतीय कंपनी Tata Motors ने Tata Nexon EV, Tata Tigor EV या दोन इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत.

Mahindra लवकरच देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास
Mahindra EV - E KUV100
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 5:52 PM
Share

मुंबई : भारतीय ऑटो मार्केटमध्ये स्वस्त इलेक्ट्रिक कार आणण्याची शर्यत आणखी तीव्र होणार आहे. जिथे आधी भारतीय कंपनी Tata Motors ने Tata Nexon EV, Tata Tigor EV या दोन इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. त्यासोबत कंपनीने Tata Altroz ​​EV आणि Tata Punch EV सादर करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत महिंद्राने टाटा मोटर्सशी स्पर्धा करण्याची तयारी केली आहे. आता Mahindra & Mahindra पुढील वर्षी भारतात अनेक इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याचा विचार करत आहे. यामध्ये पहिला क्रमांक महिंद्रा केयूव्ही इलेक्ट्रिकचा (Mahindra eKUV100) आहे. (Mahindra will soon launch the cheapest electric car in the country, know everything about EV car)

महिंद्राची आगामी मायक्रो SUV Mahindra KUV100 इलेक्ट्रिकचे ऑटो एक्सपो 2020 मध्ये पहिल्यांदा अनावरण करण्यात आले होते. तेव्हापासून मीडिया रिपोर्ट्स येत आहेत की, ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक SUV असेल. अलीकडेच या कारचं रेडी व्हर्जन टेस्टिंगदरम्यान पाहायला मिळालं आहे. त्यानंतर अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे की, ही कार लवकरच बाजारात दाखल होईल. या कारचा लूक फॉसिल फ्यूल व्हेरिएंटसारखा असेल.

सिंगल चार्जवर 140 किलोमीटर ड्रायव्हिंग रेंज

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, महिंद्राच्या या आगामी कारमध्ये 40Kw इलेक्ट्रिक मोटर सेटअप मिळेल. यात 15.9kWh बॅटरी पॅक असेल, जो 40 bhp पॉवर आणि 120 Nm टॉर्क जनरेट करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा KUV100 इलेक्ट्रिक सिंगल चार्जमध्ये 140 किमी पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देईल.

6 तासांत बॅटरी पूर्ण चार्ज होणार

चार्जिंग क्षमतेबद्दल सांगायचे तर, घरच्या घरी एसी चार्जरच्या मदतीने तुम्ही या कारची बॅटरी 6 तासात पूर्णपणे चार्ज करु शकता. त्याच वेळी, DC फास्ट चार्जिंगद्वारे, ही बॅटरी एका तासापेक्षा कमी वेळेत 80 टक्के पर्यंत चार्ज केली जाऊ शकते.

कदाचित टाटा मोटर्स कंपनी लवकरच टाटा पंचचे इलेक्ट्रिक व्हेरिएंट लाँच करु शकते आणि त्यानंतर KUV100 इलेक्ट्रिक थेट पंच इलेक्ट्रिकशी स्पर्धा करेल. मात्र, लोकप्रियतेच्या बाबतीत कोणती कार बाजी मारणार, याची माहिती या कार्स लॉन्च झाल्यानंतरच कळणार आहे.

इतर बातम्या

कावासकीने भारतात लॉन्च केली मोटरसायकल, जाणून घ्या किती आहे या बाईकची किंमत

ऑलिम्पियन सुमित अंतिलला महिंद्राचं शानदार गिफ्ट, XUV700 ची पहिली Javelin Gold Edition भेट

PHOTO | ही आहे जगातील पहिली इलेक्ट्रिक टू-सीटर फॉर्म्युला रेस कार, जाणून घ्या काय आहे खास

(Mahindra will soon launch the cheapest electric car in the country, know everything about EV car)

Follow Us
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला.
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा.
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला.
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप.
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ.
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला.
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?.