AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : या हेल्दी स्नॅक्सचा आहारात समावेश करा, वाढलेले वजन कमी होईल!

ऑफिसमध्ये एकाच जागी बसून काम करावे लागते. यादरम्यान अनेक वेळा कामाच्या दडपणाखाली आपण जास्त अन्न खातो किंवा अजिबात खात नाहीत. सतत बसणे ही आता सर्वांचीच कॉमन समस्या बनली आहे. यामुळेच सतत बसल्यामुळे अनेकांचे वजनही झपाट्याने वाढत आहे.

Health Care : या हेल्दी स्नॅक्सचा आहारात समावेश करा, वाढलेले वजन कमी होईल!
आरोग्य
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 6:27 AM
Share

मुंबई : ऑफिसमध्ये एकाच जागी बसून काम करावे लागते. यादरम्यान अनेक वेळा कामाच्या दडपणाखाली आपण जास्त अन्न खातो किंवा अजिबात खात नाहीत. सतत बसणे ही आता सर्वांचीच कॉमन समस्या बनली आहे. यामुळेच सतत बसल्यामुळे अनेकांचे वजनही झपाट्याने वाढत आहे. जेवल्यानंतरही सतत बसल्यामुळे पोट वाढण्याची समस्या महिला असो की पुरुष सर्वांनाच भेडसावत आहे. ऑफिसमध्ये बहुतांशी अस्वास्थ्यकर अन्न खातात. त्यामुळे त्यांचे वजनही वाढते.

1. ओट्स

ऑफिसमध्ये जेवल्यावरही मधेच थोडी भूक लागते, त्यामुळे अनेकदा आपण चिप्स किंवा नमकीन वगैरे खातो. हे वजन तर वाढवतेच पण आरोग्यासाठीही घातक आहे. त्याऐवजी तुम्ही ऑफिसच्या वेळेत ओट्स किंवा नाचणीची बिस्किटे खाऊ शकता आणि ते फायदेशीर देखील आहे.

2. मुरमुरे

ऑफिसमध्ये स्नॅक्स आणि पिझ्झा, बर्गर खायला सगळ्यांनाच आवडतं. पण त्याऐवजी तुम्ही मुरमुरे खाऊ शकता. ते खायलाही खूप हलके असतात आणि वजन नियंत्रणात ठेवतात.

3. सुकामेवा

कोणत्याही भुकेसाठी आणि झटपट उर्जेसाठी सुक्या मेव्यापेक्षा चांगला पर्याय काहीही असू शकत नाही. प्रत्येक फळाचे स्वतःचे पोषक असतात. त्यामुळे तुम्ही साधे किंवा हलके ड्रायफ्रुट्सही खाऊ शकता.

4. नारळ पाणी

कार्यालयीन वेळेत कोल्ड ड्रिंक्स पिणे आरोग्यासाठी हानिकारक तर असतेच शिवाय वजनही झपाट्याने वाढते. त्याऐवजी नारळ पाणी प्या. आजकाल पॅकिंग नारळ पाणी देखील बाजारात उपलब्ध आहे. नारळ पाणी प्यायल्याने तुमची फॅट कमी होईल तसेच चेहर्‍यावरही चमक येईल.

5. ताजी फळे

ऑफिसला जाताना रोज फळं सोबत घ्यायला विसरू नका. सफरचंद, केळी, द्राक्षे, संत्री आणि टरबूज यांसारख्या फळांचा आहारात समावेश करावा.

6. लो फॅट चीज, दही किंवा फ्रूट स्मूदी

जेव्हा तुम्हाला काहीतरी वेगळे खावेसे वाटते, तेव्हा तुम्ही लो फॅट चीज, दही आणि फ्रूट स्मूदीही खाऊ शकता. यामुळे वजनही कमी होईल आणि चवही चांगली येईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.