मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला दुर्मिळ व्हेल मासा, सुटकेच्या थराराचा व्हिडीओ

अरबी समुद्रातील दुर्मिळ असणारा व्हेल मासा भाईंदरमध्ये काही मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला. (Rare whale fish caught in fisherman net at Bhayandar)

मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला दुर्मिळ व्हेल मासा, सुटकेच्या थराराचा व्हिडीओ
bhayandar wheal fish
Follow us
| Updated on: May 13, 2021 | 12:50 PM

ठाणे : अरबी समुद्रातील दुर्मिळ असणारा व्हेल मासा भाईंदरमध्ये काही मच्छिमारांच्या जाळ्यात अडकला. हा व्हेल मासा 15 ते 20 फूट लांब होता. यानंतर त्या मच्छिमारांनी त्यांना पुन्हा समुद्रात सोडून जीवदान दिले आहे. भाईंदरच्या पाताण भाटेबंदर बंदरावर ही घटना घडली. (Rare whale fish caught in fisherman net at Bhayandar Video Viral)

दुर्मिळ माशांच्या शिकारीवर बंदी 

व्हेल, डॉल्फिन आणि देवमासा सारखे मासे दुर्मिळ होत चालले आहेत. यामुळे शासनाने या माश्यांवर शिकारीवर बंदी घातली आहे. तसेच त्याची शिकार करु नये, असे सक्त आदेशही दिले आहेत. व्हेल माश्याचे पंख कापून विकले तर त्याला काळ्या बाजारात मोठी किंमत मिळते. त्यामुळे अनेक स्थानिक मच्छिमार इमानदारीने जाळे कापून त्या माश्यांना समुद्रात सोडतात. याचाच प्रत्यय बुधवारी भाईंदरच्या उत्तन पाली गावातील पाताण भाटेबंदर बंदरावर आला.

जाळे कापत व्हेल माशाची सुटका

भाईंदरच्या उत्तन पाली गावात पाताण भाटेबंदर बंदरावरील येथील उत्तन वाहतूक मच्छीमार सोसायटीचे सदस्य डेव्हिड गऱ्या हे नेहमी प्रमाणे मच्छिमारीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या सहारा बोटीच्या जाळ्यात अरबी समुद्रातील दुर्मिळ असणारा व्हेल मासा अडकला. हा मासा साधारण 15 ते 20 फूट लांबीचा होता.

यानंतर बोटीवरील मच्छिमारांनी जाळे कापत त्या व्हेल माशाची सुटका केली. त्याचे वजन साधारण 1500 किलो इतके होते. त्याचा व्हिडीओ बनवून त्यांनी मच्छिमार सोसायटीला दिल्याने त्यांना 25 हजारांची नुकसान भरपाई देण्यात आली. या माशाची सुटका करण्यासाठी मच्छिमारांना जवळपास दोन तास मेहनत घ्यावी लागली. (Rare whale fish caught in fisherman net at Bhayandar Video Viral)

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.